Cricketer Died : धक्कादायक! सामना जिंकला पण जीव गमावला; विजयाचा जल्लोष करताना हृदयविकाराचा झटका, पाहा VIDEO

Cricketer Ahmar Khan tragically died : उत्तर प्रदेशातील मुरादाबाद येथे टी-२० क्रिकेट सामन्यादरम्यान एका खेळाडूचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची दुखद घटना घडली. सामना जिंकल्यानंतर जल्लोष करताना मुरादाबादच्या अहमर खान या खेळाडूला हृदयविकाराचा झटका आला आणि त्याचा मृत्यू झाला. सहकारी खेळाडूंनी सीपीआर देऊन त्याचा जीव वाचवण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांना यश आले नाही. ज्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.
यूपी व्हेटरन्स क्रिकेट असोसिएशनद्वारे रविवारी (१२ ऑक्टोबर) मुरादाबाद येथे आयोजित टी-२० क्रिकेट स्पर्धेत मुरादाबाद आणि संभल यांच्यात सामना खेळवला गेला. मुरादाबाद संघाने प्रथम फलंदाजी करत २० षटकांत ९ गडी बाद १३४ धावा केल्या. प्रत्युत्तरात संभल संघ २० षटकांत ६ गडी बाद १२१ धावांपर्यंतच मजल मारू शकला.
आज के टाइम में जिंदगी कितनी सस्ती है देख लो
मुरादाबाद
क्रिकेट मैच के दौरान क्रिकेटर(बॉलर) की हार्ट अटैक से मौत,परिवार में मचा कोहराम pic.twitter.com/PuVIL2SPxK— VIVEK YADAV (@vivek4news) October 13, 2025
मुरादाबादकडून शेवटचे षटक टाकणारा अहमर खान सामना जिंकल्यानंतर जल्लोष करत असताना अचानक जमिनीवर कोसळला. सहकाऱ्यांनी तातडीने सीपीआर दिले, परंतु काहीच प्रतिसाद न मिळाल्याने त्याला रुग्णालयात नेले गेले, जिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
हेही वाचा – IND vs WI : वेस्ट इंडिजचा ऐतिहासिक पराक्रम! कँपबेल-होपच्या शतकाने संपला ५१ वर्षांचा दुष्काळ
मैदानावरील आणि मैदानाबाहेरील लोकप्रिय व्यक्तिमत्व
अहमर खान हा मुरादाबादमध्ये अत्यंत लोकप्रिय खेळाडू होता. अनेक वर्षांपासून तो यूपी व्हेटरन्स क्रिकेट स्पर्धांमध्ये मुरादाबादचे प्रतिनिधित्व करत होता. माजी भारतीय खेळाडू पियूष चावलासोबतही त्याने स्थानिक क्रिकेट सामने खेळले होते. मैदानावरील उत्कृष्ट खेळाडूवृत्ती आणि मैदानाबाहेर मृदू स्वभाव यासाठी तो प्रसिद्ध होता. या दुखद घटनेने सर्वांनाच धक्का बसला आहे.
हेही वाचा – Vaibhav Suryavanshi : १४ वर्षीय वैभवला मिळाली मोठी जबाबदारी! ‘या’ संघाची सांभाळणार धुरा
आयोजकांनी व्यक्त केले दुख:
स्पर्धेच्या आयोजकांनी ही घटना अत्यंत दुखद असल्याचे सांगितले. अहमर खानच्या निधनाने क्रिकेट विश्वात शोककळा पसरली आहे. क्रिकेटच्या मैदानावर विजय मिळवणारा अहमर आयुष्याच्या शर्यतीत मात्र हरला, अशी भावना व्यक्त होत आहे. हृदयविकाराच्या झटक्याने क्रिकेटपटूंमध्ये होणाऱ्या मृत्यूच्या वाढत्या घटनांमुळे चिंता व्यक्त केली जात आहे.





