Monsoon Session : पावसाळी अधिवेशनात इंडिया आघाडी आक्रमक होणार; ‘या’ मुद्द्यांवरून सरकारला घेरणार
आगामी २० जुलै ते १३ ऑगस्ट दरम्यान होणाऱ्या संसदेच्या पावसाळी अधिवेशनात (Monsoon Session) विरोधी पक्षांची इंडिया आघाडी केंद्र सरकारला विविध मुद्द्यांवरून धारेवर धरण्यासाठी सज्ज झाली आहे.

Monsoon Session : आगामी २० जुलै ते १३ ऑगस्ट दरम्यान होणाऱ्या संसदेच्या पावसाळी अधिवेशनात (Monsoon Session) विरोधी पक्षांची इंडिया आघाडी केंद्र सरकारला विविध मुद्द्यांवरून धारेवर धरण्यासाठी सज्ज झाली आहे.
अयोध्येतील राम मंदिर देणगी गैरव्यवहार प्रकरण, नीट वैद्यकीय प्रवेश परीक्षेतील (Monsoon Session) पेपरफुटी, वाढती बेरोजगारी, भ्रष्टाचार आणि विरोधी पक्षांमध्ये फूट पाडून दोन-तृतीयांश बहुमताचा आकडा गाठण्याचे भाजपचे कथित प्रयत्न, या मुद्द्यांवरून संसदेत जोरदार गदारोळ होण्याची शक्यता आहे.
राष्ट्रीय जनता दलाचे नवनिर्वाचित खासदार सुधाकर सिंह यांनी वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत ही माहिती दिली. सुधाकर सिंह यांनी आरोप केला की, भाजप स्वतःकडे पुरेसे संख्याबळ नसतानाही अजेंडा रेटण्यासाठी आणि विरोधी पक्षांना कमकुवत करण्यासाठी फोडाफोडीचे (Monsoon Session) राजकारण करत आहे.
भाजपला देशभरातील विरोधी पक्ष फोडून संसदेत दोन-तृतीयांश बहुमत मिळवायचे आहे. परंतु, इंडिया आघाडी या प्रयत्नांना एकजुटीने विरोध करेल. बेरोजगारी, भ्रष्टाचार आणि मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरिक्षण प्रक्रियेतील त्रुटी यांसारखे जनतेचे ज्वलंत मुद्दे संसदेत प्रकर्षाने मांडले जातील.
देशातील विरोधी खासदारांचे होत असलेले पक्षांतर कायदेशीर चौकटीला हरताळ फासणारे आहे. जर हे असेच सुरू राहिले, तर भारताची अवस्था चीन, रशिया किंवा उत्तर कोरियासारखी होईल, जिथे फक्त नावापुरती लोकशाही उरली आहे. निवडणूक आयोगाच्या मतदार याद्यांच्या पुनरिक्षण प्रक्रियेवर संशय व्यक्त करत सुधाकर सिंह यांनी थेट मतदानाच्या अधिकारावर गदा आणली जात असल्याचा आरोप केला.
जर खऱ्या मतदारांची नावे यादीतून वगळली गेली, तर निवडणुका मतपेटीतून नाही तर मतदार यादीतूनच जिंकल्या जातील, असे ते म्हणाले. तसेच, केंद्र सरकारने वन नेशन, वन इलेक्शन (एक देश, एक निवडणूक) किंवा मतदारसंघांची पुनर्रचना यांसारखे संविधानाला आणि लोकशाही हक्कांना कमकुवत करणारे कायदे आणल्यास, इंडिया आघाडी संसदेत आणि रस्त्यावर उतरूनही तीव्र संघर्ष करेल, असा इशारा त्यांनी दिला.
नीट परीक्षेतील गैरव्यवहाराला सिंह यांनी राष्ट्रीय संकट असे संबोधिले. हा आता केवळ एका परीक्षेचा विषय राहिलेला नाही, तर भारताच्या संपूर्ण शिक्षण व्यवस्थेवरील विश्वासाचे हे संकट आहे. हजारो विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाले असून अनेक तरुण नैराश्यात (Monsoon Session) गेले आहेत. सोनम वांगचुक आणि कॉकरोच जनता पार्टीच्या नेतृत्वाखाली दिल्लीतील जंतरमंतर येथे सुरू असलेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला त्यांनी १०० टक्के पाठिंबा दर्शवला. तसेच संसदेचे अधिवेशन सुरू झाल्यावर इंडिया आघाडीचे खासदार दिल्लीत विद्यार्थ्यांच्या खांद्याला खांदा लावून उभे राहतील, असे त्यांनी सांगितले.






