मोनाली ठाकूरची लाईव्ह कॉन्सर्टदरम्यान बिघडली तब्येत; रुग्णालयात करावे लागले दाखल

Singer Monali Thakur | बॉलिवूड पार्श्वगायिका मोनाली ठाकूरने आपल्या गाण्याने प्रेक्षकांच्या मनात एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. पश्चिम बंगाल येथील दिनहाटा महोत्सवात तिच्या लाईव्ह कॉन्सर्टचे आयोजन केले होते. मात्र लाईव्ह कॉन्सर्ट दरम्यान तिची तब्येत बिघडल्याचे सांगितले जात आहे. भर कॉन्सर्टमध्ये श्वास घेण्यास त्रास होत असल्याने तिला तातडीने दिनहाटा येथील उप-जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. सध्या मोनालीवर रुग्णालयात उपचार सुरु करण्यात आले आहेत.
नेमकं काय घडलं?
पश्चिम बंगाल येथील दिनहाटा महोत्सवात गाणं गात असताना अचानक मोनाली ठाकूरची तब्येत बिघडली. त्यानंतर तेथील इव्हेंट मॅनेजमेंटकडून तत्काळ परफॉर्मन्स थांबवण्यात आला. त्यांच्या टीमने ताबडतोब वैद्यकीय मदत मागितली आणि काही मिनिटांतच एक रुग्णवाहिका आली आणि गायकाला ताबडतोब जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले.
मोनालीला सध्या कूचबिहारमधील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून तिच्यावर उपचार सुरू आहेत.अद्याप मोनाली ठाकूर किंवा तिच्या टीमने याबाबत कोणतीही माहिती दिलेली नाही. यामुळे मोनाली ठाकूरचे चाहते देखील चिंतेत आहेत. Singer Monali Thakur |
मोनाली ठाकूरबद्दल सांगायचे झाले तर, तिला ‘ये मोह मोह के धागे’साठी राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. तर ‘सवार लूँ’ गाण्यासाठी तिने फिल्मफेअर पटकावला. तिने अनेक सिंगिंग रिॲलिटी शोमध्ये जजची भूमिका देखील पार पाडली आहे. Singer Monali Thakur |
हेही वाचा:





