IND vs WI : मोहम्मद सिराजचा ऐतिहासिक पराक्रम! स्टार्कला मागे टाकत ठरला जगातील पहिला गोलंदाज

Mohammed Siraj overtakes Mitchell Starc : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेला आजपासून नरेंद्र मोदी स्टेडियम अहमदाबाद येथे सुरुवात झाली. सामन्या पहिल्या दिवसअखेर भारतीय संघाने 41 धावांची आघाडी घेतली आहे. भारताने वेस्ट इंडिजचा पहिला डाव अवघ्या 16 धावांवर रोखला. यानंतर आपल्या पहिल्या डावात भारतीय संघाने पहिल्या दिवसअखेर 2 बाद 121 धावा केल्या आहेत. केएल राहुल 53 धावांवर नाबाद आहे. दरम्यान वेगवान मोहम्मद सिराजने 4 विकेट्स घेत एक खास पराक्रम केला आहे.
मोहम्मद सिराजची ऐतिहासिक कामगिरी –
या सामन्यात मोहम्मद सिराजने 2025 मध्ये वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (WTC) खेळणाऱ्या सर्व संघांमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज होण्याचा मान मिळवला. सिराजने 2025 मध्ये आतापर्यंत 7 कसोटी सामन्यांमधील 12 डावांत एकूण 30 विकेट्स घेतल्या आहेत. वेस्ट इंडिजविरुद्ध तिसरी विकेट्स घेताच त्याने या वर्षीच्या यादीत अव्वल स्थान पटकावले. यामुळे त्याने ऑस्ट्रेलियाचा दिग्गज वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कला मागे टाकले, ज्याने 14 डावांत 29 विकेट्स घेतल्या आहेत.
Mohammed Siraj picks up his third wicket in the morning session 🔥🔥🔥
West Indies 42/4
Live – https://t.co/Dhl7RtiY7q #INDvWI #1stTEST #TeamIndia @IDFCfirstbank pic.twitter.com/TDIBwmxsNU
— BCCI (@BCCI) October 2, 2025
डब्ल्यूटीसी 2025 मध्ये सर्वाधिक विकेट्स घेणार टॉप 5 गोलंदाज:
- मोहम्मद सिराज – 30 विकेट्स (12 डाव)
- मिचेल स्टार्क – 29 विकेट्स (14 डाव)
- नॅथन लायन – 24 विकेट्स (11 डाव)
- शमार जोसेफ – 22 विकेट्स (6 डाव)
- जोश टंग – 21 विकेट्स (8 डाव)
हेही वाचा – IND vs WI : सिराजच्या वेगवान चेंडूवर ध्रुव जुरेलने घेतला नेत्रदिपक झेल, VIDEO होतोय तुफान व्हायरल
नव्या डब्ल्यूटीसी चक्रातही सिराज अव्वल –
मोहम्मद सिराजचे हे यश फक्त या वर्षापुरते मर्यादित नाही. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या नव्या चक्रात (2025-27) तो सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज ठरला आहे. भारताने या चक्राची सुरुवात इंग्लंडविरुद्धच्या 5 कसोटी सामन्यांच्या मालिकेने केली, जी 2-2 अशी बरोबरीत संपली. या मालिकेत सिराज भारताचा सामनावीर ठरला. भारतासाठी सिराज आता गोलंदाजी आक्रमणाचा लीडर बनला आहे, विशेषतः जसप्रीत बुमराहच्या तंदुरुस्ती व्यवस्थापनाच्या पार्श्वभूमीवर.
हेही वाचा – IND vs WI : जसप्रीत बुमराहने WTC मध्ये रचला इतिहास, भारतात असा करणारा पहिलाच वेगवान गोलंदाज
देशी-विदेशी परिस्थितीत विकेट्स घेण्याची त्याची क्षमता त्याला वेगळी ओळख देते. लाईन आणि लेंथवरील नियंत्रण, स्विंग आणि सीम हालचाली यांमुळे तो फलंदाजांसाठी सातत्याने आव्हानात्मक ठरतो. या सामन्यात सिराजच्या कामगिरीमुळे भारताने पहिल्या दिवशीच वेस्ट इंडिजवर दबदबा निर्माण केला असून, पुढील दिवसांतही त्याच्याकडून अशाच आक्रमक गोलंदाजीची अपेक्षा आहे.





