Mohammed Siraj : मुंबईला हरवलं, मनही जिंकलं; सिराजच्या हृदयस्पर्शी कृतीने चाहते भारावले! नेमकं काय केलं? जाणून घ्या

सिराजची प्रभावी गोलंदाजी, हैदराबादचा विजय –
१२ डिसेंबर रोजी मुंबईविरुद्ध झालेल्या सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीच्या सामन्यात सिराजने आपल्या प्रभावी कामगिरीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. मुंबईविरुद्धच्या या सामन्यात सिराजने ३.५ षटकांमध्ये केवळ १७ धावा देत ३ महत्त्वपूर्ण विकेट्स घेतल्या. त्याच्या या शानदार गोलंदाजीमुळे हैदराबादच्या विजयात मोठी भूमिका पार पाडली. या उत्कृष्ट कामगिरीसाठी त्याला प्लेअर ऑफ द मॅच (POTM) पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
🚨 Shandaar Spell by Mohammed Siraj Against Mighty Mumbai In SMAT Quarterfinal.
Shubham Hegde ❎️
Shardul Thakur ❎️
Tanush Kotian ❎️His Spell – 3.5-0-17-3 🫡
Won The Player Of The Match 🔥#SyedMushtaqAliTrophy #MohammedSiraj
— Cricket भक्त (@CricBhakt7380) December 12, 2025
तन्मय अग्रवालची मॅच विनिंग खेळी –
Brilliant sportsmanship from senior pro Mohammed Siraj as he shares his POTM award with Hyderabad opener Tanmay Agarwal! 🙌💙
Siraj: 3/21 🔥
Tanmay: 75(40) 💥A perfect blend of humility and heroics!#MohammedSiraj #TanmayAgarwal #Sportsmanship #SMAT #HyderabadCricket pic.twitter.com/gh8wCqwHMs
— Cricadium (@Cricadium) December 12, 2025
हैदराबादसाठी या धावसंख्येचा पाठलाग करताना सलामीवीर तन्मय अग्रवालने वादळी खेळी केली. त्याने ४० चेंडूंमध्ये ७ चौकार आणि ४ षटकारांच्या मदतीने नाबाद ७५ धावांची मॅच विनिंग खेळी साकारली. तन्मयने ज्या पद्धतीने फलंदाजी केली, तो देखील ‘प्लेअर ऑफ द मॅच’ पुरस्काराचा हक्कदार होता.
हेही वाचा – क्रिकेट जगतात खळबळ! मॅच फिक्सिंग प्रकरणात भारताचे 4 खेळाडू निलंबित, ACA ने उचलले मोठे पाऊल
सिराजच्या ‘या’ कृतीने जिंकली सर्वांची मनं –
सिराजला त्याच्या उत्कृष्ट गोलंदाजीसाठी पुरस्कार मिळाला असला, तरी तन्मय अग्रवालला ७५ धावांची मॅच विनिंग खेळी करूनही कोणताही वैयक्तिक पुरस्कार मिळाला नाही. मात्र, पुरस्कार स्वीकारण्यासाठी पोहोचलेल्या मोहम्मद सिराजने एक हृदयस्पर्शी कृती केली. त्याने आपला ‘प्लेअर ऑफ द मॅच’ पुरस्कार आपला सहकारी तन्मय अग्रवाल याच्यासोबत शेअर केले.सिराजच्या या खिलाडूवृत्तीचे आणि संघभावनेचे चाहते जोरदार कौतुक करत आहेत.
हेही वाचा – IND vs SA : गंभीर-पंड्या यांच्यात ड्रेसिंग रूममध्ये जोरदार खडाजंगी? व्हायरल व्हिडिओने खळबळ!
या कामगिरीमुळे सिराजने टी-२० आंतरराष्ट्रीय संघात पुनरागमन करण्यासाठी निवड समितीचे लक्ष वेधून घेतले आहे. सामन्याबद्दल बोलायचे तर प्रथम फलंदाजी करताना मुंबईचा संघ अवघ्या १३१ धावांवर ऑलआऊट झाला, ज्यात सिराजची सुरुवातीची गोलंदाजी अत्यंत महत्त्वाची ठरली. त्यानंतर १३२ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना हैदराबाद संघाने ११.५ षटकांत ९ विकेट्स राखून सहज विजय मिळवला.





