T20 World Cup 2024 : तेलंगणा सरकारकडून मोहम्मद सिराजचा सन्मान..! केली मोठी घोषणा, बक्षीस म्हणून देणार सरकारी नोकरी अन्…..

Mohammed Siraj & Telangana CM A Revanth Reddy : मोहम्मद सिराज हा टी-20 विश्वचषक विजेत्या टीम इंडियाचा एक भाग होता. सिराजने अनेक प्रसंगी भारतीय संघासाठी चमकदार कामगिरी केली आहे. टीम इंडियाने 2024 च्या टी-20 वर्ल्ड कपमध्ये दमदार कामगिरी करत विजेतेपद पटकावले. भारतीय संघाच्या विजयानंतर खेळाडूंचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. या संदर्भात तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी नुकतीच सिराज यांची भेट घेतली. त्यांनी सिराजला सरकारी नोकरी आणि भूखंड (प्लॉट) देण्याची घोषणा केली आहे.
खरं तर, तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी मोहम्मद सिराज याची भेट घेऊन त्याचा सन्मान केला तसेच भारतीय संघाच्या विजयाबद्दल अभिनंदन केले. यासोबतच त्याला सरकारी नोकरी देण्याची घोषणा करण्यात आली. हैदराबादमध्ये घर बांधण्यासाठी सिराजला जमीन देण्याची सुध्दा घोषणा करण्यात आली आहे. यावेळी सिराज यांनी मुख्यमंत्र्यांना टीम इंडियाची जर्सी भेट दिली. सिराज आणि मुख्यमंत्र्यांच्या भेटीदरम्यान भारताचा माजी क्रिकेटपटू मोहम्मद अझरुद्दीनही उपस्थित होता. तेलंगणाच्या सीएमओने या भेटीची छायाचित्रे आणि व्हिडिओ शेअर केला आहे.
అంతర్జాతీయ క్రికెట్లో భారత దేశానికి, మన తెలంగాణ రాష్ట్రానికి గొప్ప పేరు ప్రఖ్యాతులు తెచ్చిన అల్ రౌండ్ క్రికెటర్ @mdsirajofficial గారిని ముఖ్యమంత్రి @revanth_anumula గారు అభినందించారు. #T20WorldCup ను గెలుచుకున్న అనంతరం హైదరాబాద్కు వచ్చిన్న సిరాజ్ ముఖ్యమంత్రిగారిని ఆయన… pic.twitter.com/hDf6s2ezr0
— Telangana CMO (@TelanganaCMO) July 9, 2024
मोहम्मद सिराज हा मूळचा तेलंगणाचा आहे. टीम इंडियात पोहोचण्यासाठी त्याने खूप मेहनत घेतली आहे. आयपीएलच्या पहिल्या होम मॅचमध्ये सिराजने घातक गोलंदाजी केली होती. यानंतर त्याला भारतीय संघात स्थान मिळाले.
सिराजच्या आतापर्यंतच्या कारकिर्दीवर नजर टाकली तर ती शानदार अशी आहे. सिराजने भारतासाठी 41 एकदिवसीय सामने खेळले आहेत. या कालावधीत 68 विकेट्स घेतल्या आहेत. त्याने 27 कसोटी सामन्यात 74 बळी घेतले आहेत. सिराजने भारताकडून 13 टी-20 सामन्यात 12 विकेट घेतल्या आहेत.





