Virat Kohli Alibaug House : समुद्र किनारा आणि करोडोंचा खर्च..! Video मध्ये पाहा, आतून कसा आहे कोहलीचा ‘विराट’ असा बंगला…

Virat Kohli Alibaug House Video : सध्या विराट कोहली पत्नी अनुष्का शर्मासोबत लंडनमध्ये आहे. कोहली आपली मुलगी वामिका आणि मुलगा अकाय यांना वेळ देत आहे. दरम्यान, त्याने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे. कोहलीने त्याच्या अलिबागमधील बंगल्याचा व्हिडिओ शेअर केला आहे. यासाठी त्यांनी कोट्यवधी रुपये खर्च केले आहेत. हा बंगला तयार व्हायला खूप वेळ लागला. आता कोहलीने व्हिडीओच्या माध्यमातून चाहत्यांना त्याच्या घराची सफर घडवून आणली आहे.
कोहलीचा बंगला समुद्रापासून काही अंतरावर आहे. हे घर त्यांनी खास पद्धतीने बांधले आहे. सुट्ट्यांमध्ये इथेच राहण्याचा त्यांचा प्लॅन आहे. कोहलीच्या बंगल्यात अनेक प्रकारच्या सुविधा आहेत. यात जिम आणि स्विमिंग पूल तसेच लांब लाउंज क्षेत्र आहे. कोहलीचे हे घर सजवण्यासाठी लाखो रुपये खर्च करण्यात आले आहेत. त्याचे इंटीरियर बरेच आलिशान आहे. महत्त्वाची बाब म्हणजे बंगला हा हायटेक सुविधांनी सुसज्ज आहे.
कोहलीचे घर तयार व्हायला लागले एक वर्ष…
विराट कोहलीचे हे घर तयार व्हायला एक वर्षाहून अधिक काळ लागला. त्यांनी सांगितले की या घरातील लिव्हिंग स्पेस सर्वात चांगला दिसतो. कोहलीलाही या घराचे इंटीरियर खूप आवडले. घराबाहेर मोठे उद्यान आहे. चालण्यासोबतच ते येथे योगाही करू शकतात. जर आपण स्विमिंग पूलबद्दल बोललो तर तो लिव्हिंग रूमपासून थोड्या अंतरावर आहे.
कोहलीने शेअर केलेल्या या व्हीडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिले की, अलिबागमध्ये आमचं घर बांधण्याचा हा प्रवास एक छान अनुभव होता आणि ते तयार होताना पाहून खूप आनंद होत आहे.
The journey of building my Alibaug home has been a seamless experience, and seeing it all come together is truly gratifying. Huge thanks to the entire Avas team for making our dream home a reality. Can’t wait to enjoy every moment here with my loved ones!#avaswellness… pic.twitter.com/x17iL3ETfM
— Virat Kohli (@imVkohli) July 9, 2024
मीडिया रिपोर्टनुसार, 2022 मध्ये, विराटने 19 कोटी रुपयांना 8 एकरचा भूखंड खरेदी केला होता. त्यानंतर त्याने त्या जागेवर आलिशान बंगला बांधला. विराट कोहलीचा हा अलिबागमधील आलिशान बंगला बांधण्यात 13 कोटी रुपयांचा खर्च आला आहे. चार बेडरूम असलेल्या या बंगल्यामध्ये तापमान नियंत्रित पूल, जकूझी, बेस्पोक किचन, गार्डन, कव्हर पार्किंग, स्टाफ क्वार्टर यासारख्या गोष्टी उपलब्ध आहेत. कोहलीचा हा आलिशान बंगला 2000 स्क्वेअर फूटमध्ये पसरलेला आहे. या बंगल्यात 400 स्क्वेअर फूटचा स्विमिंग पूलही आहे.
The journey of building my Alibaug home has been a seamless experience, and seeing it all come together is truly gratifying. Huge thanks to the entire Avas team for making our dream home a reality. Can’t wait to enjoy every moment here with my loved ones!#avaswellness… pic.twitter.com/x17iL3ETfM
— Virat Kohli (@imVkohli) July 9, 2024
कोहली या व्हिडिओमध्ये त्याच्या या नव्या घराबद्दल सांगताना दिसत आहे. तो म्हणाला, “मला लिव्हिंग स्पेस आणि लिव्हिंग स्पेसमधून बाहेर जाण्यासाठी जी सोय आहे जी विराटला सर्वात जास्त आवडते. ही जागा सुंदर तर आहेच पण नैसर्गिक प्रकाशाच्या बाबतीत जसं विराटला अपेक्षित होतं अगदी तसंच काम बारकाईने केलेलं आहे. हे ठिकाण आराम करण्यासाठी आणि निर्धास्तपणे वेळ घालवण्याचं वातावरण निर्माण करणारी आहे.”
कोहली-अनुष्का लंडनला शिफ्ट झाल्याची बातमी
विराट आणि त्याची पत्नी अनुष्का सध्या लंडनमध्ये आहेत. अनुष्का खूप दिवसांपासून तिकडेच आहे. अलीकडेच कोहली त्याच्या कुटुंबासह लंडनला शिफ्ट होणार असल्याच्या बातम्या आल्या आहेत. मात्र याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.





