IND vs ENG : सिराजने स्टोक्सला बाद करत रचला इतिहास, ‘हा’ पराक्रम करणारा ठरला जगातील पहिलाच गोलंदाज

IND vs ENG Mohammed Siraj Creates History : भारत आणि इंग्लंड यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्यादरम्यान भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजने एक खास विक्रम नोंदवला. सिराजने इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सला पहिल्याच चेंडूवर बाद केले. असे करणारा तो जगातील पहिला खेळाडू ठरला आहे. यापूर्वी कसोटी क्रिकेटमध्ये बेन स्टोक्स कधीही गोल्डन डकवर (पहिल्याच चेंडूवर शून्य बाद) बाद झाला नव्हता.
सिराजने रचला इतिहास –
भारताविरुद्ध दुसऱ्या कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्स सहाव्या क्रमांकावर फलंदाजीसाठी उतरला. मात्र, तो पहिल्याच चेंडूवर बाद झाला. स्टोक्सच्या कारकिर्दीत असा प्रसंग प्रथमच घडला आहे. ५ डिसेंबर २०१३ रोजी अॅडलेड ओव्हल येथे ऑस्ट्रेलियाविरुद्ध इंग्लंडसाठी कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केल्यापासून स्टोक्सने ११३ कसोटी सामन्यांतील २०२ डावांमध्ये १६ वेळा खाते न उघडता बाद झाला होता. परंतु, शुक्रवारी (४ जुलै २०२५) प्रथमच तो कसोटी क्रिकेटमध्ये पहिल्याच चेंडूवर शून्यावर बाद झाला.
That’s two in twoooooo…. 🔥#MohammedSiraj is on fire at the moment as he dismisses the English skipper, #BenStokes for a GOLDEN DUCK! 🤩🤩
𝗬𝗲𝗵 𝘀𝗲𝗲𝗸𝗵𝗻𝗲 𝗻𝗮𝗵𝗶, 𝘀𝗲𝗲𝗸𝗵𝗮𝗻𝗲 𝗮𝗮𝘆𝗲 𝗵𝗮𝗶 😎👊🏻#ENGvIND 👉 2nd TEST, Day 3 | LIVE NOW on JioHotstar ➡… pic.twitter.com/lG7FoBArNx
— Star Sports (@StarSportsIndia) July 4, 2025
जगातील नंबर १ कसोटी गोलंदाज जसप्रीत बुमराहच्या अनुपस्थितीत बर्मिंगहॅम कसोटी सामन्यात भारताच्या गोलंदाजी आक्रमणाची धुरा मोहम्मद सिराजने सांभाळली. इंग्लंडच्या पहिल्या डावातील २२व्या षटकातील तिसऱ्या चेंडूवर सिराजने जो रूटला २२ धावांवर बाद केले आणि पुढच्याच चेंडूवर बेन स्टोक्सला खाते न उघडू देता पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. रूट आणि स्टोक्स दोघांनाही यष्टिरक्षक ऋषभ पंतने यष्ट्यांमागे झेलबाद केले. शुक्रवारी इंग्लंडला रूट आणि स्टोक्सकडून मोठ्या अपेक्षा होत्या, परंतु दोघेही फलंदाजीत विशेष योगदान देऊ शकले नाहीत.
हेही वाचा – IND vs ENG : जेमी स्मिथचे ऐतिहासिक शतक! इंग्लंडसाठी ‘हा’ खास पराक्रम करणारा ठरला पहिलाच खेळाडू
स्मिथ-ब्रूक यांच्यात २०० धावांची भागीदारी पूर्ण –
भारतीय संघाने पहिल्या डावात उभारलेल्या ५८७ धावांच्या प्रत्युत्तरात इंग्लंडची सुरुवात चांगली झाली नाही. मात्र, आता जेमी स्मिथ आणि हॅरी ब्रूक यांनी इंग्लंडच्या डावाला सावरले आहे. या दोघांनी सहाव्या विकेट्ससाठी २०० हून अधिक धावांची भागीदारी केली आहे. त्यामुळे ही जोडी भारतीय गोलंदाजासाठी डोकेदुखी ठरत आहे. दोघांनीही आपापली शतके पूर्ण केली आहेत.
हेही वाचा – IND vs ENG : धक्कादायक! शुबमन गिलच्या डोक्याला लागला वेगवान चेंडू, VIDEO होतोय व्हायरल
भारताविरुद्ध इंग्लंडसाठी सहाव्या किंवा त्यापेक्षा खालच्या विकेटसाठी ही पहिलीच २०० हून अधिक धावांची भागीदारी आहे. यापूर्वी इंग्लंडसाठी या स्थानावर सर्वोच्च भागीदारी १९८ धावांची होती, जी जो रूट आणि जेम्स अँडरसन यांच्यात २०१४ मध्ये ट्रेंट ब्रिज येथे झाली होती. ही भागीदारी कसोटी क्रिकेटमधील दहाव्या विकेटसाठी सर्वात मोठी भागीदारी म्हणून आजही विक्रम आहे.





