IND vs ENG : ब्रूक-सिराज भिडले! लीड्स कसोटीत तणावपूर्ण शाब्दिक चकमक, VIDEO व्हायरल

IND vs ENG verbal Siraj-Brook Argument : भारत आणि इंग्लंड संघांत पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना लीड्समध्ये खेळला जात आहे. या सामन्यात भारतीय संघाने पहिल्या डावाच्या जोरावर ६ धावांची आघाडी घेतली आहे. या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करताना ४७३ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात इंग्लंडचा संघ ४६५ धावांत गारद झाला. बुमराहने सर्वाधिक ५ विकेट्स घेतल्या. दरम्यान या सामन्यात ब्रूक आणि सिराजमध्ये शाब्दिक चकमक पाहायला मिळाली, ज्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.
सिराज-ब्रूक एकमेकांशी भिडले –
तिसऱ्या दिवसाच्या खेळाच्या दुसऱ्या सत्रात, जेव्हा हॅरी ब्रूक वेगाने धावा काढत होता, तेव्हा सिराजच्या चेंडूवर त्याचा शॉट चुकला, त्यानंतर दोघांमध्ये काहीसा वाद झाला. इंग्लंडच्या डावातील ८४ व्या षटकात हॅरी ब्रूक फलंदाजी करत असताना, टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजचा पाचवा चेंडू समजून घेण्यात ब्रूकने चूक केली. तो चेंडू खेळपट्टीवर पडल्यानंतर थोडा आत आला आणि चेंडू त्याच्या कोपरावर आदळला आणि ऑफ साईडकडे गेला. चेंडू लागल्यानंतर ब्रूकला थोडे वेदना होत असल्याचे दिसून आले, तर मोहम्मद सिराजही काही वेळ त्याच्याकडे पाहत असल्याचे दिसून आले.
वादाचा व्हिडीओ व्हायरल –
Aur bol Siraj ko kuch , hogya na out 😤😤pic.twitter.com/3aCsPWx12f
— Satyam (@Satyam_pj) June 22, 2025
यादरम्यान, दोघांमध्ये काही बाचाबाचीही झाली. त्याच वेळी, षटकाच्या शेवटच्या चेंडूवर धाव घेत ब्रूक नॉन-स्ट्राइक एंडवर पोहोचला तेव्हा सिराज आणि त्याच्यामध्ये काहीशी बाचाबाची झाली. भारताविरुद्ध प्रथमच कसोटी क्रिकेटमध्ये फलंदाजीला उतरलेला हैरी ब्रूकने आपल्या खेळाने सर्वांना प्रभावित केले, परंतु तो शतकापासून केवळ एक धाव दूर राहिला. प्रसिद्ध कृष्णाने आपल्या शानदार बाउन्सर चेंडूवर ब्रूकला ९९ धावांच्या वैयक्तिक धावसंख्येवर पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. या सामन्यात ब्रूकने आपल्या खेळीदरम्यान ११ चौकार आणि २ षटकार मारण्यात यश मिळवले.
हेही वाचा – IND vs ENG : शुबमन गिलच्या निर्णयाने बुमराहची कारकीर्द धोक्यात? जाणून घ्या काय आहे कारण?
जसप्रीत बुमराहने घेतल्या सर्वाधिक पाच विकेटस –
इंग्लंडचा संघ पहिल्या डावात ४६५ धावांवर ऑलआउट झाला. अशाप्रकारे भारताला सहा धावांची आघाडी मिळाली. त्याआधी भारताने ४७१ धावा केल्या होत्या. इंग्लंडसाठी पहिल्या डावात सर्वाधिक धावा ऑली पोपने केल्या. त्याने १३७ चेडूंत १०६ धावांची खेळी साकारली. त्याचबरोबर हॅरी ब्रूकने अवघ्या ११२ चेंडूंत ९९ धावांची खेळी साकारली. भारताकडून जसप्रीत बुमराहने सर्वाधिक पाच विकेट्स घेतल्या. कसोटीत त्याने १४व्यांदा एका डावात पाच विकेट्स घेतल्या. त्याच वेळी प्रसिद्ध कृष्णाने तीन आणि मोहम्मद सिराजने दोन विकेट्स घेतल्या.





