Mohammed Shami : मोहम्मद शमीच्या ‘त्या’ वक्तव्याने क्रीडा विश्वात खळबळ ! म्हणाला…
भारतीय क्रिकेट संघातील स्टार वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी (Mohammed Shami) सध्या त्याच्या खेळासोबतच एका वक्तव्यामुळे चांगलाच चर्चेत आला आहे.

Mohammed Shami : भारतीय क्रिकेट संघातील स्टार वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी (Mohammed Shami) सध्या त्याच्या खेळासोबतच एका वक्तव्यामुळे चांगलाच चर्चेत आला आहे. मैदानातील कमबॅकपेक्षा त्याच्या देशभक्तीच्या घोषणांवरील वक्तव्याची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. ‘वंदे मातरम’ म्हणण्यावर किंवा ‘भारत माता की जय’चा नारा देण्यावर आक्षेप घेणाऱ्यांना शमीने थेट आणि रोखठोक शब्दांत प्रत्युत्तर दिले आहे.
‘माझ्या देशाचे नाव घेण्यात काय गैर?’
एका वाहिनीला दिलेल्या एका विशेष मुलाखतीत मोहम्मद शमीला (Mohammed Shami) ‘वंदे मातरम’ आणि देशभक्तीच्या मुद्द्यावर विचारणा करण्यात आली होती. त्यावर बोलताना तो म्हणाला, “आपल्या देशाबद्दल अभिमान व्यक्त करण्यासाठी ‘वंदे मातरम’ किंवा ‘भारत माता की जय’ म्हणण्यात गैर काहीच नाही. मी माझ्याच देशाचे नाव घेत आहे, तर त्यामुळे माझं काय नुकसान होणार?”
शमीने पुढे स्पष्ट केले की, जर देशाने किंवा सरकारने एखादा नियम केला असेल, तर त्याचे पालन करणे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे. देशभक्तीच्या घोषणांचा धर्म किंवा जातीशी संबंध जोडणे पूर्णपणे चुकीचे असल्याचे सांगत त्याने अशा प्रकारच्या राजकारणावर निशाणा साधला.
‘मी कोणाच्या दबावाला घाबरत नाही’
आपल्या भूमिकेवर ठाम राहत शमीने सांगितले की, अशा प्रश्नांचा सामना त्याने यापूर्वीही कॅमेऱ्यासमोर केला आहे. मात्र, कोणाच्याही दबावाला किंवा टीकेला तो घाबरत नाही, असा ठाम विश्वास त्याने व्यक्त केला.
संघात पुनरागमनासाठी शमीचा संघर्ष
दुसरीकडे, मोहम्मद शमीच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील पुनरागमनाबाबत अद्याप प्रश्नचिन्ह कायम आहे. दुखापतीमुळे बराच काळ मैदानाबाहेर राहिल्यानंतर त्याने चॅम्पियन्स ट्रॉफीदरम्यान भारतीय संघात पुनरागमन केले होते. मात्र, दुखापतीची समस्या पुन्हा उद्भवल्याने तो सध्या टी-२०, वनडे आणि कसोटी या तिन्ही फॉरमॅटमधून बाहेर आहे. चाहत्यांकडून त्याच्या पुनरागमनाची सातत्याने मागणी होत असली, तरी निवड समितीच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
दुलीप ट्रॉफीवर सर्वांचे लक्ष
मोहम्मद शमीने (Mohammed Shami) मात्र अद्याप हार मानलेली नाही. देशांतर्गत क्रिकेट आणि आयपीएलच्या माध्यमातून स्वतःची तंदुरुस्ती आणि फॉर्म सिद्ध करण्यासाठी तो कसून प्रयत्न करत आहे. २३ ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या दुलीप ट्रॉफीमध्ये तो पूर्व विभागाकडून मैदानात उतरणार आहे.
या स्पर्धेतील त्याची कामगिरी हीच त्याच्या भारतीय संघात परतण्याचे दरवाजे उघडू शकते. आगामी काळात शमी (Mohammed Shami) संघात पुन्हा स्थान मिळवतो की त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीचा प्रवास थांबतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.






