Ambati Rayudu Slams : “तो अंतर्गत राजकारणाचा बळी ठरला…”, सर्फराझला डावलल्याने अंबाती रायुडू भडकला; गंभीर-आगरकरला विचारला थेट जाब
Ambati Rayudu Slams : भारताचा माजी खेळाडू अंबाती रायुडू याने आक्रमक पवित्रा घेत निवड समिती आणि संघ व्यवस्थापनावर गंभीर आरोप केले आहेत.

Ambati Rayudu Questions Gautam Gambhir Ajit Agarkar About Sarfaraz Khan Drop : भारतीय क्रिकेट वर्तुळात सध्या आगामी श्रीलंका दौऱ्याची (Sri Lanka Tour) जोरदार चर्चा सुरू आहे. या दौऱ्यासाठी जाहीर झालेल्या कसोटी संघात मुंबईचा आक्रमक फलंदाज सर्फराझ खान (Sarfaraz Khan) याला स्थान न मिळाल्याने नव्या वादाला तोंड फुटले आहे. देशांतर्गत क्रिकेटमध्ये धावांचा पाऊस पाडून भारतीय संघात स्थान मिळवणाऱ्या सर्फराजला अचानक संघातून का वगळले? याचे कोणतेही स्पष्ट कारण समोर आलेले नाही. या पार्श्वभूमीवर भारताचा माजी खेळाडू अंबाती रायुडू (Ambati Rayudu) याने आक्रमक पवित्रा घेत निवड समिती आणि संघ व्यवस्थापनावर गंभीर आरोप केले आहेत.
“सर्फराझ राजकारणाचा बळी ठरला!”
एका मुलाखतीत बोलताना अंबाती रायुडूने सर्फराझ खानची बाजू घेत निवडकर्त्यांना धारेवर धरले. तो म्हणाला, “सर्फराझ खानला जेव्हा जेव्हा भारतीय संघात किंवा देशांतर्गत क्रिकेटमध्ये संधी मिळाली, तेव्हा त्याने स्वतःला सिद्ध केले आहे. असे असतानाही त्याला सातत्याने कसोटी संघातून डावलणे अत्यंत अन्यायकारक आहे. रेड बॉल क्रिकेटसाठी त्याला पूर्णपणे बाजूला करण्यात आले आहे. जर क्रिकेटमधील राजकारणाला चेहरा असता, तर तो अगदी असाच दिसला असता. सर्फराझ हा अंतर्गत राजकारणाचा बळी ठरला आहे.”
🚨 AMBATI RAYUDU ON SARFARAZ KHAN TEST SNUB
Sarfaraz Khan has been totally ignored in red-ball cricket. If politics had a face, it would look like this. He has done well for India, averaging close to 40 in Tests. Ajit Agarkar and Gautam Gambhir should answer his omission.
There… pic.twitter.com/6LoTMmjtwB
— Mufaddal Atif (@MufaddalAtif) August 2, 2026
ड्रेसिंग रूममधील माहिती लीक झाल्याची चर्चा?
🚨SARFARAZ KHAN HAS BEEN A VICTIM OF POLITICS – AMBATI RAYUDU🤯
Ambati Rayudu said :🗣️
“Sarfaraz Khan has been totally ignored for the red ball cricket. If politics had a face, it will be like this only, he has been a victim of politics. He played half a dozen matches & done so… pic.twitter.com/Jb8Op4BH9Z
— Akshat (@Cricketmythos) August 1, 2026
माध्यमांमध्ये सध्या सर्फराझ खानने ड्रेसिंग रूममधील काही गोपनीय माहिती बाहेर लीक केल्याच्या चर्चा रंगत आहेत. या अफवांवर भाष्य करताना रायुडू म्हणाला, “जर कोणत्याही अंतर्गत वादामुळे किंवा अशा अफवांमुळे सर्फराझला संघातून काढले असेल, तर त्याला दिलेली ही शिक्षा खूपच कठोर आहे.”
रायुडूने मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर आणि मुख्य निवडकर्ता अजित आगरकर यांना जाहीर प्रश्न विचारत म्हटले, “सर्फराझने भारतासाठी ६ कसोटी सामने खेळताना ४० च्या सरासरीने उत्कृष्ट कामगिरी केली आहे. मग तुम्ही अजून काय अपेक्षा करता, मित्रांनो? आगरकर आणि गंभीरने सर्फराझला संघाबाहेर का केले, याचे स्पष्टीकरण दिले पाहिजे.” आता रायुडूच्या या वक्तव्यानंतर सर्फराझच्या पुनरागमनाचा सस्पेन्स आणखी वाढला आहे.





