Shami On Virat : विराटच्या वारंवार वृंदावन जाण्यावर शमीचं मोठं वक्तव्य; म्हणाला, “जर पती-पत्नी दर्शनासाठी जात असतील, तर…”
Shami On Virat : विराटच्या या वारंवार होणाऱ्या वृंदावन दौऱ्यांवर आणि अध्यात्माकडे वळण्यावर सोशल मीडियावर विविध चर्चा रंगत असतात, यावर मोहम्मद शमीने प्रतिक्रिया दिली आहे.

Mohammed Shami Support Virat Kohli Vrindavan Premanand Maharaj Visit : भारतीय क्रिकेट संघाचा स्टार फलंदाज विराट कोहली (Virat Kohli) मागील काही वर्षांपासून सातत्याने पत्नी अनुष्का शर्मा आणि मुलांसोबत (वामिका आणि अकाय) वृंदावन येथील संत प्रेमानंद महाराज (Premanand Maharaj) यांच्या दर्शनासाठी जात असतो. विराटच्या या वारंवार होणाऱ्या वृंदावन दौऱ्यांवर आणि अध्यात्माकडे वळण्यावर सोशल मीडियावर विविध चर्चा रंगत असतात. आता या मुद्द्यावर त्याचा सहकारी आणि भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने (Mohammed Shami) आपले स्पष्ट मत मांडले असून, “यावर कोणालाही आक्षेप असण्याचे कारण नाही,” असे ठामपणे सांगितले आहे.
“लोकांनी प्रश्न का उपस्थित करावेत?”
एका मुलाखतीत बोलताना मोहम्मद शमी म्हणाला, “विराट कोहली हा अत्यंत शिस्तप्रिय आणि पॅशनेट खेळाडू आहे. तो आपल्या प्रत्येक कामासाठी वेळ काढतो. जिथे महाराजजींकडे जाण्याचा प्रश्न आहे, मला वाटत नाही की कोणाला यावर आक्षेप असावा किंवा कोणी प्रश्न उपस्थित करण्याची गरज आहे. जर पती-पत्नी एकत्र दर्शनासाठी जात असतील तर त्यात अडचण काय? एखादी चांगली गोष्ट अंगीकारणे ही चांगलीच बाब आहे. एकाऐवजी दोघे जात असतील तर ते अधिक उत्तम आहे.”
कठीण काळातून अध्यात्माकडे वळला!
🔴 IF VIRAT BELIEVES, LET HIM BELIEVE – MOHD SHAMI 🤯
🎙️: Shami defended Virat Kohli’s spiritual journey, saying there’s nothing sudden about it.
He called Kohli a passionate and disciplined person who does everything with dedication and believes everyone has the right to… pic.twitter.com/hgbsStSxqr
— Sam (@cricsam02) August 4, 2026
विराट जेव्हा आपल्या कारकिर्दीतील अत्यंत कठीण टप्प्यातून जात होता आणि धावा काढण्यासाठी संघर्ष करत होता, तेव्हापासून त्याचा अध्यात्माकडे कल वाढल्याचे दिसले. त्याच्या हातात जपमाळ आणि टॅली काउंटरही अनेकदा दिसले आहे.
मोहम्मद शमीच्या पुनरागमनाची प्रतीक्षा –
दुसरीकडे, ३५ वर्षीय मोहम्मद शमी सध्या भारतीय संघातून बाहेर आहे. श्रीलंका कसोटी मालिकेतून जसप्रीत बुमराह दुखापतीमुळे बाहेर पडल्यानंतर शमीला संधी मिळेल अशी चर्चा होती. मात्र, निवडकर्त्यांनी जम्मू-काश्मीरच्या आकिब नबीला संधी दिल्याने शमीच्या कसोटी पुनरागमनाचा मार्ग आता खडतर मानला जात आहे.





