पंतप्रधान मोदींनी केले ‘सिंदूर’च्या रोपट्याचे वृक्षारोपन ; कच्छच्या महिलांनी दिली होती रोपट्याची भेट

Modi tree plantation । पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल मंत्रिमंडळाच्या बैठकीत ‘ऑपरेशन सिंदूर’वर सविस्तर चर्चा केली होती. त्यात आज जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून मोदींनी ‘सिंदूर’च्या रोपट्याचे वृक्षारोपन केले आहे. पंतप्रधानांच्या निवासस्थानावरील वृक्षारोपणाचे फोटो पंतप्रधान मोदींच्या अधिकृत सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आले आहेत.
पंतप्रधान मोदींनी फोटोच्या कॅप्शनमध्ये, “१९७१ च्या युद्धात धैर्य आणि शौर्याचे अद्भुत उदाहरण सादर करणाऱ्या कच्छच्या शूर माता आणि बहिणींनी माझ्या अलिकडच्या गुजरात भेटीदरम्यान मला सिंदूर भेट दिली.”असे लिहिले आहे. त्यांनी पुढे लिहिले की, “आज जागतिक पर्यावरण दिनी, नवी दिल्लीतील पंतप्रधानांच्या निवासस्थानी ते रोप लावण्याचे सौभाग्य मला मिळाले आहे.” असे म्हटले आहे. Modi tree plantation ।
तसेच पुढे पंतप्रधान मोदींनी त्यांच्या सोशल मीडिया पोस्टमध्ये, “ही वनस्पती आपल्या देशाच्या महिला शक्तीच्या शौर्याचे आणि प्रेरणेचे एक मजबूत प्रतीक राहील. ‘असे म्हटले आहे. उल्लेखनीय म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी १० दिवसांपूर्वी गुजरात दौऱ्यावर होते. दाहोदमधील एका सभेत बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले होते की, जर कोणी आपल्या बहिणींचे सिंदूर पुसण्याचा प्रयत्न केला तर त्याचे स्वतःचेही पुसणे निश्चित आहे.
#WATCH | During his recent visit to Kutch, a group of women who had shown remarkable courage in the 1971 war met PM Modi and presented Sindoor saplings to him. PM Modi was touched by this gesture and said that he would plant this Sindoor at his residence. Today, on World… pic.twitter.com/07mEYMkowP
— ANI (@ANI) June 5, 2025
निवासस्थान परिसरात लावले रोप Modi tree plantation ।
त्यांनी म्हटले होते की,”ऑपरेशन सिंदूर ही केवळ लष्करी कारवाई नाही हे आपल्या भारतीयांच्या मूल्यांचे आणि भावनांचे अभिव्यक्ती देखील आहे. पहलगाम हल्ल्याचा उल्लेख करताना पंतप्रधान मोदींनी असेही म्हटले होते की दहशतवाद्यांनी काहीही केले तरी मोदी गप्प राहू शकतात का? दहशतवादाला आश्रय देणाऱ्यांनी स्वप्नातही कल्पना केली नसेल की मोदींशी स्पर्धा करणे इतके कठीण होईल.”
कच्छच्या धाडसी महिलांनी पंतप्रधानांना सिंदूर भेट
२२ एप्रिल रोजी जम्मू-काश्मीरमधील पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी पर्यटकांवर भ्याड हल्ला केला होता. या हल्ल्यात, दहशतवाद्यांनी २६ निहत्था पर्यटकांना त्यांच्या धर्माबद्दल विचारल्यानंतर त्यांची हत्या केली. दहशतवाद्यांनी महिलांसमोर त्यांचे वैवाहिक जीवन उद्ध्वस्त केले होते. या दहशतवादी हल्ल्यानंतर, भारतीय सैन्याने ६ आणि ७ मे च्या रात्री ऑपरेशन सिंदूर सुरू केले. ऑपरेशन सिंदूर अंतर्गत, लष्कराने पाकव्याप्त काश्मीरपासून पंजाबपर्यंतचे नऊ दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले होते.





