नवी दिल्ली – कॉंग्रेसने शुक्रवारी रूपयाच्या घटत्या मुल्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडले. रूपयासाठी मोदी हानिकारक आहेत. त्यांचे सरकार दिशाहीन बनले आहे, अशा आरोपांची सरबत्ती कॉंग्रेसने केली.
मागील काही काळापासून रूपयाच्या मुल्यात घसरणीचे सत्र सुरू आहे. प्रति डॉलरच्या तुलनेत ते मुल्य 80 रूपयांच्या उंबरठ्यावर जाऊन पोहचले आहे. त्यावरून कॉंग्रेसच्या प्रवक्त्या सुप्रिया श्रीनेत यांनी पत्रकार परिषदेत मोदी आणि त्यांच्या सरकारवर टीकेची झोड उठवली.
गुजरातचे मुख्यमंत्री असताना मोदींनी रूपयाच्या घटत्या मुल्यावरून कॉंग्रेसच्या नेतृत्वाखालील केंद्रातील युपीए सरकारला लक्ष्य केले होते. त्यांच्या त्यावेळच्या वक्तव्यांचीही सुप्रिया यांनी आठवण करून दिली. पंतप्रधानांची प्रतिष्ठा रूपयाशी जोडलेली असते. रूपयाच्या घसरणीमुळे पंतप्रधानांची प्रतिष्ठा आणि विश्वासार्हताही कमी होते.
सहकारी संस्थांच्या निवडणुकांनाही स्थगिती; नवीन वेळापत्रक लवकरच जाहीर होणार
रूपया बळकट करण्यासाठी मजबूत पंतप्रधान हवा, असे मोदी यांनी म्हटल्याकडे त्यांनी लक्ष वेधले. आता मोदी त्यांच्या आधीच्या वक्तव्यांविषयी काय बोलतील? आता ते मौन बाळगून आहेत. रूपयाच्या घटणाऱ्या मुल्याचा फटका प्रत्येक भारतीयाला बसेल, असा इशाराही त्यांनी दिला.
राष्ट्रकुल स्पर्धेसाठी सायनाला डावलल्यानंतर नवरा कश्यप संतापला; म्हणाला, “जी खेळाडू…”