Modi Government : मोदी सरकारमध्ये भूकंप? मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत
केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारला (Modi Government) ९ जून रोजी दोन वर्षे पूर्ण होत आहेत. या निमित्ताने केंद्रीय मंत्रिमंडळात मोठ्या फेरबदलाची आणि विस्ताराची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

Modi Government : केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारला (Modi Government) ९ जून रोजी दोन वर्षे पूर्ण होत आहेत. या निमित्ताने केंद्रीय मंत्रिमंडळात मोठ्या फेरबदलाची आणि विस्ताराची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
आगामी काळातील राजकीय गणिते आणि विधानसभा निवडणुका (Modi Government) डोळ्यासमोर ठेवून अनेक बड्या मंत्र्यांची गच्छंती होण्याची, तर काही नव्या चेहऱ्यांना संधी मिळण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.
7 राज्यांमधील निवडणुकांवर भाजपचे लक्ष
पश्चिम बंगाल आणि आसामसारख्या मोठ्या राज्यांमध्ये विजय मिळवल्यानंतर भाजपचा आत्मविश्वास (Modi Government) दुणावला आहे. आता पक्षाने आगामी काळात होणाऱ्या उत्तर प्रदेश, पंजाब, उत्तराखंड, मणिपूर, गोवा, गुजरात आणि हिमाचल प्रदेश या सात राज्यांच्या विधानसभा निवडणुकांवर आपले लक्ष केंद्रित केले आहे.
या सातपैकी पाच राज्यांत सध्या भाजपची सत्ता आहे, तर दोन राज्यांत भाजप सत्तेबाहेर आहे. या राज्यांमधील प्रादेशिक व जातीय समीकरणे साधण्यासाठी आणि मतदारांना आकर्षित करण्यासाठी या निवडणुकीला सामोरे जाणाऱ्या राज्यांमधील खासदारांना मंत्रिमंडळात झुकते माप दिले जाण्याची शक्यता आहे.
मोदी सरकारचा ‘मंत्रिमंडळ विस्तार पॅटर्न’ काय सांगतो?
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पूर्वेतिहास पाहिला, तर ते निवडणुका आणि कामगिरीच्या आधारावर रणनीतिक बदल करण्यासाठी ओळखले जातात.
पहिली टर्म (२०१४): सरकार स्थापनेनंतर नोव्हेंबर २०१४ (अवघ्या ६ महिन्यांत), जुलै २०१६ आणि सप्टेंबर २०१७ अशा तीन टप्प्यांत विस्तार झाला होता.
दुसरी टर्म (२०१९): सत्ता स्थापनेनंतर २ वर्षांनी म्हणजेच जुलै २०२१ मध्ये पहिला मोठा फेरबदल झाला होता, तर मे २०२३ मध्ये केवळ खात्यांची अदलाबदल करण्यात आली होती.
हाच पॅटर्न पाहता, तिसऱ्या टर्मची २ वर्षे पूर्ण होत असताना मोदी सरकार पुन्हा एकदा मंत्रिमंडळ फेरबदलाचा मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे.
मंत्रिमंडळ संख्या ८१ वर पोहोचणार
सध्या पंतप्रधान मोदींच्या मंत्रिमंडळात ७२ मंत्री आहेत. नियमांनुसार ही संख्या जास्तीत जास्त ८१ पर्यंत वाढवता येऊ शकते. म्हणजेच आगामी काळात ९ नव्या मंत्र्यांची वर्णी लागण्याची शक्यता आहे.
या विस्तारासाठी पंतप्रधान कार्यालयाने (PMO) आधीच सर्व मंत्रालयांकडून त्यांच्या कामाचा सविस्तर तपशील मागवला होता. त्यानंतर एका विशेष बैठकीत सर्व विभागांच्या कामगिरीचा आढावा घेऊन त्यांना मानांकन (Rating) देण्यात आले आहे. ज्या मंत्र्यांची कामगिरी अपेक्षेनुसार झालेली नाही, त्यांना घरचा रस्ता दाखवला जाऊ शकतो.
संघटनात्मक हालचाली वाढल्या; ‘या’ दोन मंत्र्यांबाबत सस्पेन्स
गेल्या काही दिवसांत भाजपच्या संघटनात्मक आणि सरकारी पातळीवर कमालीच्या हालचाली (Modi Government) वाढल्या आहेत. केंद्रीय मंत्री रवनीत सिंग बिट्टू आणि जॉर्ज कुरियन यांचा कार्यकाळ येत्या २१ जून रोजी संपत आहे. असे असूनही पक्षाने त्यांना राज्यसभेसाठी पुन्हा उमेदवारी नाकारल्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे.
एकंदरीत, आगामी विधानसभा निवडणुका जिंकण्याच्या हेतूने आणि प्रशासकीय कामाला गती देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी लवकरच आपल्या मंत्रिमंडळाची ‘नवी टीम’ जाहीर करण्याची शक्यता आहे.





