मोदी 3.0 | शपथविधी सोहळ्याचे LIVE अपडेट्स; गणपतराव जाधव यांनी घेतली मंत्रिपदाची शपथ

Updated On:

Narendra Modi swearing in ceremony । NDA संसदीय पक्षाचे नेते नरेंद्र मोदी आज (दि. 9) तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली आहे. शुक्रवारी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी नरेंद्र मोदींना सरकार स्थापनेचे निमंत्रण दिले होते. त्यानंतर आज नरेंद्र मोदींचा शपथविधी पार पडला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आगमन झालं असून, यावेळी राष्ट्रपती भवनात जल्लोष पाहायला मिळाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी, राजनाथ सिंह यांच्यानंतर अमित शाह यांनी शपथ घेतली. तसेच नितीन गडकरीही मोदींच्या मंत्रिमंडळात असून त्यांनी देखील मंत्रिपदाची घेतली शपथ घेतली.

डॉ. एस जयशंकर यांनीही केंद्रीय मंत्रीपदाची शपथ घेतली. जयशंकर यांनी या आधी परराष्ट्र मंत्री म्हणून काम पाहिलं आहे. निर्मला सीतारामण यांना दुसऱ्यांदा मोदींच्या मंत्रिमंडळात मंत्रिपदाची संधी मिळाली आहे.

सीतारामण यांनी आज पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली. त्या आधी मोदी मंत्रिमंडळात अर्थमंत्री होत्या.कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री एचडी कुमारस्वामी यांनी केंद्रीय कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेतली. त्यानंतर पियुष गोयल यांनी देखील मंत्रिपदाची शपथ घेतली.

धर्मेंद्र प्रधान , जीतन राम मांझी, राजीव रंजन सिंह या नेत्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. सर्वानंद सोनोवाल यांनी केंद्रीय मंत्री पदाची शपथ घेतली. ज्योतिरादित्य शिंदे यांनी घेतली केंद्रीय कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेतली. चिराग पासवान यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे.

अन्नपूर्णादेवी यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. त्यांच्यानंतर किरेन रिजिजू यांनी देखील केंद्रीय कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेतली. हरदीप सिंग पुरी यांनी केंद्रीय कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेतली. त्यांच्यानंतर डॉ. मनसुख मांडवीय यांनी शपथ घेतली.अर्जुनराम मेघवाल यांच्यानंतप प्रतापराव गणपतराव जाधव यांनी शपथ घेतली

यामध्ये पहिल्यांदाच पुण्याचे खासदार झालेल्या मुरलीधर मोहोळ यांचाही समावेश आहे. नरेंद्र मोदींच्या मंत्रीमंडळात महाराष्ट्रातील नितीन गडकरी, पियुष गोयल, मुरलीधर मोहोळ, रक्षा खडसे, शिंदे गटाचे खासदार प्रतापराव जाधव आणि रिपाईचे रामदास आठवले यांना संधी मिळाली आहे.

पंतप्रधान मोदींनी राजघाटावर महात्मा गांधींना श्रद्धांजली अर्पण करून आजच्या दिवसाची सुरुवात केली. माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनाही त्यांनी सदैव अटल येथे आदरांजली वाहिली. त्यानंतर त्यांनी राष्ट्रीय युद्ध स्मारकावर जाऊन पुष्पहार अर्पण केला. नरेंद्र मोदी यांच्या शपथविधी सोहळ्याला शेजारील देशातील अनेक नेत्यांनी हजेरी लावली आहे.

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार नरेंद्र मोदी यांच्या शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहण्यासाठी राष्ट्रपती भवनात पोहोचले आहेत. तसेच, भाजप नेत्या निर्मला सीतारामन, शिवराज सिंह चौहान आणि अश्विनी वैष्णव राष्ट्रपती भवनात पोहोचले आहेत.

अभिनेते शाहरुख खान आणि अक्षय कुमार यांनी राष्ट्रपती भवनात एकमेकांची गळाभेट घेतली. नरेंद्र मोदी यांच्या शपथविधी सोहळ्याला बॉलिवूडमधील अनेक कलाकारांनी उपस्थिती लावली आहे.

आणखी संबंधित बातम्या

Rahul Gandhi: राहुल गांधींचा एक फोन अन् भाजपचा सगळा प्लॅन फिस्कटला; माजी आमदार भावुक होत म्हणाले "या लढाईत मी तुमच्यासोबत राहीन"

2026-09-22 13:45:57

Rahul Gandhi: राहुल गांधींचा एक फोन अन् भाजपचा सगळा प्लॅन फिस्कटला; माजी आमदार भावुक होत म्हणाले "या लढाईत मी तुमच्यासोबत राहीन"

मोठी बातमी: राज्यातील पदवीधर आणि शिक्षक मतदार संघाच्या निवडणूकीची घोषणा

2026-09-22 11:30:15

मोठी बातमी: राज्यातील पदवीधर आणि शिक्षक मतदार संघाच्या निवडणूकीची घोषणा

Kangana Ranaut : 13 कोटींच्या Rolls-Royce मधून मैथिली ठाकूर लालबागच्या दर्शनाला येताच ट्रोल; कंगना रणौतने ट्रोलर्सना दिलं उत्तर, "काही लोकांचा जळफळाट होतो.."

2026-09-21 15:54:00

Kangana Ranaut : 13 कोटींच्या Rolls-Royce मधून मैथिली ठाकूर लालबागच्या दर्शनाला येताच ट्रोल; कंगना रणौतने ट्रोलर्सना दिलं उत्तर, "काही लोकांचा जळफळाट होतो.."

Police Officer Death : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या ताफ्यातील पोलिस अधिकाऱ्याचा मृत्यू

2026-09-21 15:41:56

Police Officer Death : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या ताफ्यातील पोलिस अधिकाऱ्याचा मृत्यू

Rahul Gandhi : ‘छात्रों की गुंज’ नव्हे ‘झूट कि गुंज’; भाजपचा राहुल गांधींवर निशाणा

2026-09-21 15:22:19

Rahul Gandhi : ‘छात्रों की गुंज’ नव्हे ‘झूट कि गुंज’; भाजपचा राहुल गांधींवर निशाणा