अवतीभोवती: सोसायट्यांना आधार मोबाइल ऍप्सचा

विकास वाळुंजकर

भाग 2

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

सोसायटी ऍपचे अनेक फायदे आहेत जसे, हरवलेले वाहन, पार्किंगचा तपशील, एखाद्या विषयावर चर्चा करण्यासाठी स्वतंत्र व्यासपीठ, त्यावरील मतदान, आवारात येणारे दूधवितरक, पेपर टाकणारी मुले, घरकाम करणारा सेवकवर्ग, सफाई सेवक, पोस्टमन, फुलं, भाजी विक्रेते अशा सर्वांचा तपशील या ऍपमध्ये उपलब्ध असतो. वाहनाचे पंक्‍चर काढणारे, प्लंबर, वायरमन, सर्पमित्र, टाक्‍या धुणारे यासारख्या सेवा देणाऱ्या व्यक्‍ती व संस्थांचे फोन क्रमांक, पत्ते इत्यादी उपयुक्‍त माहिती हे या ऍप्सचे आगळेवेगळे वैशिष्ट्य ठरले आहे.

पुण्यामध्ये सध्या “सोसायटी नाऊ’ नावाचे मोबाइल ऍप कमालीचे लोकप्रिय होत असल्याचे आढळून आले आहे. सोसायटीने उपलब्ध करून दिलेल्या सुविधा, सुरक्षारक्षकांचे व्यवस्थापन, मेटेनन्ससह गंगाजळी इत्यादीचा जमाखर्च व परिसरात मिळणाऱ्या सेवा असे चार भाग सोसायटी नाऊ या ऍपमध्ये करण्यात आले आहेत. त्याशिवाय एखाद्या उपक्रमाची घोषणा करणे, मदतीसाठी हेल्प डेस्क, दुचाकी व चारचाकी वाहनांच्या पार्किंगचे व्यवस्थापन. क्‍लबहाऊस अथवा क्रीडांगणाचे आगाऊ बुकिंग, पिझ्झा हट्‌स, झोमॅटो यासारख्या भोवतालच्या परिसरातील सेवा, लॉंड्री, किराणा, दवाखाना यासारख्या सेवांशी थेट संपर्क, मेटेनन्स किंवा भाडे वसुली व त्याचा तपशील, वीज व टेलिफोन बिल भरण्याचे व्यासपीठ, येणाऱ्या पाहुण्यांची नोंद, त्यांचे सोसायटीतील लोकेशन, फोटो, सोसायटी सेवकांची हजेरी, सुरक्षा रक्षकांची हजेरी, गेटपास अशा अनेक सुविधा विनामूल्य मिळत असल्याने सोसायटी नाऊ या ऍपला सध्या सोसायट्यांकडून मागणी आहे.

जगभर तुम्ही कुठेही फिरत असाल तरी तुमच्या मोबाइलवर सोसायटीचे कॅमेरे जोडलेले असतात. त्यामुळे घराकडे तुम्हाला सहजपणे लक्ष देता, असा नवा प्रयोग या ऍपमध्ये सुरू झाला आहे. त्यामुळे डिजिटल साक्षरतेचा पुढचा टप्पा म्हणून या सुविधेकडे प्रगतशील समाज पाहात आहे. ऍन्ड्राईड सेंट्रल नावाचे एक पाक्षिक आहे. त्यात या ऍप्सची अभ्यासपूर्ण माहिती देण्यात आली आहे. त्याचे संपादक फिल निकीन्सन म्हणतात की, Your mobile device has Quickly become the easiest portal into your digital self. सोसायट्यांमधील मोबाइलचे जग झपाट्याने बदलते आहे, असाच त्याचा मतितार्थ आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)