Amit Thackeray | मनसे प्रमुख राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांच्यावर नेरुळच्या शिवस्मारकाचं बेकायदेशीर उद्घाटन केल्या प्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. नेरूळ येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचे अनावरण गेल्या अनेक महिन्यांपासून झालेलं नव्हतं. तसेच महाराजांची मूर्ती कापडाने झाकून ठेवली होती. हे बघताच अमित ठाकरेंनी महाराजांच्या पुतळ्यावरील कपडा सुद्धा खराब झाल्याचा आरोप करत पुतळ्याचे अनावरण केले. यावेळी काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. याप्रकरणी नेरुळ पोलिसांनी त्यांना नोटीस बजावली होती. ही नोटीस देण्यासाठी पोलिस त्यांच्या निवासस्थानी देखील गेले होते. मात्र ही नोटीस स्वीकारण्यासाठी आपण स्वतः पोलीस स्टेशनला जाण्याची घोषणा त्यांनी केली. त्यानुसार आज ते स्वत: नेरुळमध्ये दाखल झाले आहेत. यावेळी मनसेकडून मोठं शक्ती प्रदर्शन करण्यात आले आहे. यावेळी अमित ठाकरें सोबत मनसे नेते बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई, संदीप देशपांडे, यशवंत किल्लेदार या प्रमुख मनसेच्या नेत्यांसह मुंबईतील विभाग अध्यक्षही आहेत. Amit Thackeray | यावेळी अमित ठाकरेंकडून शिवरायांना नेरूळमध्ये अभिवादन करण्यात आले. त्यानंतर त्यांनी पोलिस ठाण्याकडे जात नोटिस स्वीकारली. सभेदरम्यान, अमित ठाकरे यांनी महाराजांचे गड किल्ल्यांचे संवर्धन आणि सुशोभिकरण करून ते जगासमोर आणणार असल्याची मोठी घोषणा केली. समोरच्याने आपल्याला कितीही दाबण्याचा प्रयत्न केला तरी… “राजकारणात येण्याच्या अगोदरपासून मी राज ठाकरे यांना बघत आलो. त्यांनी महाराष्ट्रासाठी, मराठी माणसांसाठी अनेक केसेस झेलल्या. मराठी हक्कासाठी, मराठी माणसासाठी मनसैनिक लढत आहेत. त्यामुळे ही पहिली केस अंगावर घेण्याचा आत्मविश्वास या सर्वांमुळे मला मिळाला आहे. त्यामुळे तुमचे सर्वात अगोदर धन्यवाद मानतो. गेल्या रविवारपासून ही गोष्ट सुरू आहे. या आठवड्यात मी इतकंच शिकलोय की समोरच्याने आपल्याला कितीही दाबण्याचा प्रयत्न केला तरी महाराजांचे आणि देवांचे आशीर्वाद असले की समोरचे झुकतात,” असे अमित ठाकरे यांनी नेरुळमधील सभेत सांगितले. Amit Thackeray | हेही वाचा: शोभिताच्या नाग चैतन्याला वाढदिवसाच्या हटके शुभेच्छा; दोघांचा रोमँटिक फोटो सोशल मीडियावर केला शेअर