हातात विळे घेऊन पुण्यातील महिला माॅर्निंग वाॅकला; वसंत मोरेंची पोस्ट चर्चेत

पुणे – गेल्या काही दिवसांपासून पुण्यात कोयता गँगची मोठी दहशत होती. पोलिसांनी योग्य कारवाई करत या गॅंग विरोधात वेळीच ऍक्शन घेतल्याने पुण्यातील गुन्हेगारीला आळा बसण्यासाठी मदत झाली. तरीही कोयता गँगची चर्चा काही केल्या कमी होताना दिसत नाही. अशात मनसे नेते वसंत मोरे यांनी सोशल मीडियावर केलेली एक पोस्ट लक्षवेधी ठरत आहे. या पोस्टमध्ये काही महिला आपल्या हातात कोयता घेऊन जाताना दिसत आहेत.
वसंत मोरे यांनी कोयता आहेत घेऊन चालेल्या काही महिलांचे फोटो शेअर करत पुण्यातील गुन्हेगारीकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आहे. आपल्या पोस्टमध्ये वसंत मोरे म्हणतात,”आज सकाळी जिमला चाललो होतो. अचानक समोर तीन महिला भगिनी हातात कोयता घेऊन दिसल्या.मनात आले की इतके आमचे पुणे असुरक्षित झाले का की मॉर्निंग वॉकला जाणाऱ्या महिला कोयते घेऊन फिरू लागल्या? मी थोडा त्यांचे मागे गेलो तर त्या जनावरांसाठी चारा गोळा करत होत्या”
पुढे वसंत मोरे म्हणतात,”असं वाटण्यामागे कारण हे की मागील आठवड्यात आमच्या कात्रज गावठाणमध्ये सकाळी सहा वाजता भर रस्त्यावर एका महिलेचे मंगळसूत्र चोरून चोर रस्त्याने चक्क पळत गेला.जर पोलिसांनी कडक कारवाई नाही केली तर मग असे चित्र दिसले तर नवल वाटून घेऊ नये”
पण असं वाटण्यामागे कारण असं की मागील आठवड्यात आमच्या कात्रज गावठाण मध्ये सकाळी ६ वाजता भर रस्त्यावर एका महिलेचे मंगळसूत्र चोरून चोर रस्त्याने चक्क पळत गेला.
जर पोलिसांनी कडक कारवाई नाही केली तर मग असे चित्र दिसले तर नवल वाटून घेऊ नये.
(२/२)— Vasant More | वसंत मोरे (@vasantmore88) February 10, 2023
वसंत मोरे हे सोशल मीडियावरून अनेक महत्वाच्या विषयांकडे लक्ष वेधत असतात. यापूर्वी देखील मोरे यांनी कसबा पोटनिवडणुकीबाबत भाष्य करत थेट शिंदे फडणवीस सरकारवर निशाणा साधला होता.मोरे यांनी आता केलेली ही पोस्ट देखील लक्षवेधी ठरत आहे.





