MLC Election : शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा पहिला उमेदवार घोषित! पुण्यात राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी लढत
MLC Election : पुण्याच्या प्रतिष्ठेच्या जागेवर शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने मोठा डाव खेळत आपल्या अधिकृत उमेदवाराची घोषणा केली आहे.

MLC Election : स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून होणाऱ्या विधान परिषद निवडणुकीसाठी महाविकास आघाडीने तयारीला वेग दिला असून, जागावाटपाबाबत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. पुणे मतदारसंघाबाबत उत्सुकता असताना शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाने ही जागा लढवण्याचा निर्णय घेतला आहे. (MLC Election)
मिळालेल्या माहितीनुसार, पक्षाचे पुणे शहराध्यक्ष श्रीकांत पाटील यांना उमेदवारी देण्यात येणार असून ते आजच विधान परिषदेसाठी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी स्वतः फोन करून अर्ज भरण्याचे निर्देश दिल्याची माहिती समोर आली आहे. (MLC Election)
दरम्यान, महायुतीकडून पुण्याची जागा सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसकडे जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये या पक्षाचे संख्याबळ अधिक असल्याने महायुतीतून ही जागा त्यांच्याच वाट्याला जाईल, असे मानले जात आहे. (MLC Election)
यामुळे पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांच्यात थेट सामना रंगण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे ही निवडणूक राज्यातील सर्वाधिक चर्चेची लढत ठरू शकते. (MLC Election)
दुसरीकडे, पुण्याची जागा भाजपला मिळावी यासाठी स्थानिक भाजप नेत्यांनी प्रयत्न सुरू केले आहेत. यासाठी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन भूमिका मांडल्याचे सांगितले जात आहे. मात्र सध्याच्या संख्याबळाचा विचार करता ही जागा राष्ट्रवादीकडेच राहण्याची शक्यता अधिक मानली जात आहे. (MLC Election)
महाविकास आघाडीच्या जागावाटपाच्या सूत्रानुसार काँग्रेस ८ जागा, ठाकरे गटाची शिवसेना ४ जागा आणि शरद पवारांची राष्ट्रवादी ३ जागा लढवणार आहे. पुणे आणि ठाणे या दोन महत्त्वाच्या जागा राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या वाट्याला आल्याची माहिती आहे. (MLC Election)
दरम्यान, सुनेत्रा पवार यांनीही महायुतीकडे तीन जागांची मागणी केल्याचे स्पष्ट केले आहे. “ज्या ठिकाणी आमचे संख्याबळ आहे, त्या जागा आम्हाला मिळाव्यात अशी अपेक्षा आहे. सकारात्मक निर्णय होईल, अशी आशा आहे,” असे त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. (MLC Election)





