Shirur Accident case | शिरूर नगर परिषदेच्या प्रचारासाठी पुण्याहून शिरूरकडे निघालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार ज्ञानेश्वर कटके यांच्या भरधाव कारने ४ वर्षांच्या चिमुकलीला जोरदार धडक दिली आहे. या अपघातात शुभ्रा पंढरीनाथ बोऱ्हाडे (वय ४) ही गंभीर जखमी झाली असून, तिच्यावर पुण्यामध्ये उपचार सुरू आहेत. रविवारी दुपारी पुणे-अहिल्यानगर महामार्गावर शिरूरच्या बोऱ्हाडेमळा येथे हा अपघात झाला. नेमकं काय घडलं? आमदार ज्ञानेश्वर कटके हे वाघोली येथून शिरूर नगरपरिषदेच्या प्रचारासाठी रविवारी दुपारी शिरूर येथे येत होते. बोऱ्हाडे मळा येथील हुंदाई शोरूम समोर शुभ्रा बोऱ्हाडे ही ४ वर्षीय बालिका महामार्ग ओलांडत होती. एका कारच्या आडून ती अचानक आमदार ज्ञानेश्वर कटके यांच्या काळ्या रंगाच्या मर्सिडीज कार (क्र. एमएच१२, एनएक्स १३९१) समोर आली. ज्ञानेश्वर कटके यांच्या चालकाने जोरदार ब्रेक दाबला. परंतु गाडीच्या वेगामुळे शुभ्राला जोराची धडक बसली. यात ती उडून काही अंतरावर रस्त्यावर पडली. यात तिला गंभीर जखमी झाली. आमदार ज्ञानेश्वर कटके व त्यांच्या कार्यकर्त्यांनी कारमधून उतरून शुभ्रा हिला हॉस्पिटलमध्ये दाखल केले. सध्या तिची प्रकृती गंभीर असल्याने तिला पुढील उपचारासाठी पुणे येथे हलवण्यात आले. Shirur Accident case | दरम्यान, शिरूर नगर परिषदेचा प्रचार ऐन शिगेला पोहोचला आहे. यासाठी रविवार सुपर संडे ठरला, तर आज सोमवार प्रचाराचा शेवटचा दिवस आहे. मात्र प्रचाराला वेळेत पोहोचण्यासाठी नेत्यांची धावपळ सुरू आहे. पण या अतिघाईचा परिणाम एका चिमुकलीच्या जीवावर बेतल्याची खंत व्यक्त केली जात आहे. तर दुसरीकडे शुभ्रा ही एकटीच रस्ता ओलंडत असल्याने तिच्या पालकांचे लक्ष नव्हते का? असा सवाल देखील उपस्थित केला जात आहे. Shirur Accident case | हेही वाचा: शहरात पारा ७ अंशांवर! कडाक्याच्या थंडीला सुरुवात; पुढील दोन दिवस जोर कायम राहणार