भाजपच्या माजी आमदाराचा राष्ट्रवादीत प्रवेश

मुंबई  – भाजपचे हिंगणा मतदारसंघातील माजी आमदार विजय घोडमारे यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत आज राष्ट्रवादीत प्रवेश केला. एकीकडे भाजप-शिवसेना राष्ट्रवादीच्या आमदारांना पक्षात प्रवेश देत आहेत. तर दुसरीकडे राष्ट्रवादीने देखील काही प्रमाणात भाजपला शह देण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.

हिंगणा मतदारसंघ हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला होता, मात्र भाजपने तेथे आपला झेंडा रोवला आहे. विजय घोडमारे 2009 मध्ये नागपुरातील हिंगणा विधानसभा मतदारसंघातून आमदार होते. मात्र 2014 मधील विधानसभा निवडणुकांच्या वेळी विजय घोडमारे यांना उमेदवारी नाकारली होती. तेव्हापासून घोडमारे नाराज होते.

2019 च्या विधानसभा निवडणुका तोंडावर असताना पुन्हा तिकीट न मिळण्याची शक्‍यता असल्यामुळे नाराज असलेल्या विजय घोडमारे यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला.

दरम्यान, राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून हिंगणा मतदारसंघात उमेदवारी मिळावी, यासाठी घोडमारे प्रयत्नशील होते. जयंत पाटील यांच्या भेटीत घोडमारेंनी तिकीटासाठी प्रयत्न केल्याचेही बोलले गेले. मागील 2 निवडणुकांमध्ये या मतदारसंघात राष्ट्रवादीकडून माजी मंत्री रमेश बंग यांना पराभव स्वीकारावा लागत आहे. 2009 मध्ये बंग यांचा घोडमारेंनीच पराभव केला होता.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.

×