आमदार लक्ष्मण जगताप यांच्यावर शासकीय इतमामात होणार अंत्यसंस्कार
Updated On:

मुंबई, दि. ३: चिंचवड विधानसभा मतदार संघाचे आमदार लक्ष्मण जगताप यांचे दीर्घ आजाराने निधन झाले. त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत.
“नगरसेवक, महापौर ते विधिमंडळातील तडफदार प्रतिनिधी म्हणून आपल्या कामाचा ठसा उमटवणारे नेतृत्व काळाने हिरावून नेले आहे,” अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनाबद्दल शोकभावना व्यक्त केल्या आहेत.





