Amol Mitkari Post : विमान अपघाताचा प्राथमिक अहवाल समोर आल्यानंतर मिटकरींनी केली ‘ही’ मोठी मागणी
Amol Mitkari Post : अजित पवार यांचा विमान अपघाताचा प्राथमिक अहवाल समोर आल्यानंतर अमोल मिटकरी यांनी मोठी मागणी केली आहे.

Amol Mitkari Post : २८ जानेवारीला अजित पवार यांचे विमान अपघातात निधन झाले. त्यांंच्यासोबत असलेल्या पाच जणांना देखील आपले प्राण गमावावे लागले. यानंतर या घटनेची दखल केंद्र आणि राज्याने देखील घेत चौकशीचे आदेश दिले होते. आता या विमान अपघाताचा प्राथमिक निरीक्षण अहवाल समोर आला असून, यामध्ये महत्वाचे निरीक्षणे नोंदविण्यात आली आहेत. यावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आमदार अमोल मिटकरी यांनी प्रतिक्रिया देत मोठी मागणी केली आहे.
या दुर्देवी घटनेला आज ९ दिवस पूर्ण झाले असून, अजूनही महाराष्ट्र या धक्क्यातून सावरत आहे. जो अहवाल विमान अपघाताबाबत समोर आला आहे, त्यामध्ये अपघाताबाबत खुलासा करण्यात आला आहे. ‘अजितदादांचा विमान अपघात केवळ तांत्रिक बिघाडामुळे नाही, तर लँडिंगचा अँगलच चुकला’ अशी धक्कादायक माहिती प्राथमिक अहवालातून समोर आली आहे. तसेच अपघाताला मानवी चुकाही कारणीभूत होत्या, असे महत्वाचे निरीक्षण देखील प्राथमिक चौकशी अहवालामध्ये नमूद करण्यात आले आहे.
यानंतर अमोल मिटकरी यांनी एक्सवरून पोस्ट लिहित, UGCA नी विमानतळावरील CCTV फुटेज प्रसारित करून दादाच्या आगमनापासून विमानात बसेपर्यंत प्रत्यक्षदर्शी पुरावा सादर करावा, अशी मोठी मागणी केली आहे.
आदरणीय दादांच्या विमान अपघाताचा थातुर मातुर चौकशी अहवाल यायला सुरुवात झाली आहे.दादा इतकी सामान्य व्यक्ती नव्हती,अहवाल सांगेल तांत्रिक चुक होती व वैमानिकाचा अंदाज चुकला,व जनता मान्य करेल! महाराष्ट्र पुरावा मागतोय.UGCA नी विमानतळावरील CCTV फुटेज प्रसारित करून दादाच्या आगमनापासून… pic.twitter.com/RLqSIj5llK
— आ. अमोल गोदावरी रामकृष्ण मिटकरी (@amolmitkari22) February 6, 2026
नेमकं काय म्हणाले मिटकरी?
आदरणीय दादांच्या विमान अपघाताचा थातुर मातुर चौकशी अहवाल यायला सुरुवात झाली आहे. दादा इतकी सामान्य व्यक्ती नव्हती,अहवाल सांगेल तांत्रिक चुक होती व वैमानिकाचा अंदाज चुकला,व जनता मान्य करेल! महाराष्ट्र पुरावा मागतोय. UGCA नी विमानतळावरील CCTV फुटेज प्रसारित करून दादाच्या आगमनापासून विमानात बसेपर्यंत प्रत्यक्षदर्शी पुरावा सादर करावा.
हेही वाचा : Bike Taxi Services : रिक्षा आणि कॅबने उद्या प्रवास करणार असाल तर ही बातमी वाचा…






