West Bengal Election 2021 | भाजपच्या शेवटच्या यादीतही मिथून चक्रवर्तींचे नाव नाही

कोलकाता – भारतीय जनता पक्षाने पश्चिम बंगालसाठी आपल्या शेवटच्या तेरा उमेदवारांची यादी जाहीर केली, त्या यादीतही अभिनेते मिथून चक्रवर्ती यांचे नाव नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
मिथून चक्रवर्ती यांनी नुकताच पंतप्रधान मोदींच्या उपस्थितीत भारतीय जनता पक्षात प्रवेश केला होता. त्यामुळे ते भाजपच्या तिकीटावर विधानसभेची निवडणूक लढवतील अशी अटकळ बांधली गेली होती.
पश्चिम बंगाल मधील रासबिहारी मतदार संघातून मिथून यांना उमेदवारी दिली जाईल असे सांगण्यात येत होते, पण तेथे भाजपने आज लेफ्टनंट जनरल सुब्राता साहा यांना उमेदवारी घोषित केली आहे. त्यामुळे मिथून चक्रवर्ती निवडणुकीच्या राजकारणात उतरण्याच्या बातम्या खोट्या ठरल्या आहेत.
तथापि मिथून यांचा भाजपच्या प्रचारासाठी वापर केला जाईल असे सांगण्यात येत आहे. येत्या 30 मार्च रोजी ते नंदीग्राम मध्ये सुवेंदु अधिकारी यांच्या प्रचाराला जाणार आहेत असे, पक्षाच्या सूत्रांनी सांगितले.





