मिताली मयेकरचा बोल्ड अंदाज; स्वित्झर्लंडमधील शेअर केले फोटो

Mitali Mayekar Photoshoot| मराठमोळी अभिनेत्री मिताली मयेकर सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असल्याचे पाहायला मिळते. अनेकदा ती परदेशवारी करत असल्याचे दिसते. सध्या मिताली स्वित्झर्लंडमध्ये आहे. नुकतेच तिने येथील तिचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
इनस्टाग्रामवर शेअर केलेल्या काळ्या रंगाच्या बॉडीसूटमधील तिचे फोटो चर्चेत आले आहेत. स्विमिंग पूलमध्ये बसून मितालीने फोटोंसाठी हटके पोज दिल्या आहेत. मितालीच्या बिकिनीतील फोटोंवर अभिनेत्री अनघा भगरे, रसिका वेंगुर्लेकर यांच्यासह चाहत्यांनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे. Mitali Mayekar Photoshoot|
दरम्यान, सिद्धार्थ आणि मिताली दर सहा महिन्यांनी वेगवेगळ्या देशांमध्ये फिरण्याचा आनंद घेतात. काही महिन्यांपूर्वी त्यांची युरोप टूर केली होती. पॅरिसमधील आयफेल टॉवरसमोर दोघांनी फोटोशूट केलं होतं. त्यांचे हे फोटो चाहत्यांच्या देखील पसंतीस पडले होते. त्यानंतर मिताली इटलीमध्ये होती. सिद्धार्थ चांदेकर आणि मितालीच्या येथील फोटोला चाहत्यांचा देखील चांगला प्रतिसाद मिळाला होता.
View this post on Instagram
दरम्यान, अनेकदा मितालीला सोशल मीडियावर हॉट फोटोंमुळे ट्रोलही केले जाते. मात्र ट्रोल करणाऱ्यांना मिताली देखील सडेतोड उत्तर देताना दिसते. दरम्यान, सिद्धार्थच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर, त्याच्या ‘झिम्मा 2’ चित्रपटाला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळला. त्यानंतर सिद्धार्थ ‘ओले आले’ हा चित्रपटही दिसला. यात नाना पाटेकर, सायली संजीव यांचीही प्रमुख भूमिका होती. Mitali Mayekar Photoshoot|
हेही वाचा:
अजय देवगणच्या सिंघम अगेनचा क्लायमॅक्स सीन रिलीज होण्यापूर्वीच झाला ‘लीक’





