क्रिकेट डॉट कॉम एयूच्या माहितीनुसार, जर दिल्ली संघ चालू हंगामात अंतिम फेरीत पोहोचला तर स्टार्कला त्याच्या आयपीएल २०२५ च्या मानधनाचा एक तृतीयांश भाग द्यावा लागेल. याचा अर्थ असा की जर डावखुरा वेगवान गोलंदाज आयपीएल मध्येच सोडले, तर त्याला ३.९२ कोटी रुपयांवर पाणी सोडावं लागेल. जर असे झाले तर स्टार्कला आयपीएल मानधन म्हणून फक्त ७.८३ कोटी रुपये मिळतील.
\nहेही वाचा – Ravi Shastri : ‘विराटचे मन पूर्णपणे साफ होते, पण…’, कोहलीच्या निवृत्तीबद्दल रवी शास्त्रींचा मोठा खुलासा
\nमिचेल स्टार्कने दिल्ली कॅपिटल्ससाठी बजावली महत्त्वाची भूमिका –
\n\n\nONCE A KNIGHT, ALWAYS A KNIGHT 💜
\nMitchell Starc decided to pull out from the remaining matches of IPL2025 to clear KKR way to the playoffs!
\nThank You Mr. Starc 🙏pic.twitter.com/71IzabJs1o
\n— RI5HU SRIVASTAVA 🇮🇳 (@rishuknight15) May 16, 2025
\nमिचेल स्टार्कने आयपीएल २०२५ मध्ये दिल्ली कॅपिटल्ससाठी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. त्याने आतापर्यंत खेळलेल्या ११ सामन्यांमध्ये १४ विकेट्स घेतल्या आहेत. जर संघ प्लेऑफमध्ये पोहोचला तर संघाला स्टार्कची उणीव नक्कीच जाणवेल. तो बाद प्लेऑफमध्ये संघासाठी महत्त्वाची भूमिका बजावू शकला असता. कारण त्याने गेल्या वर्षी केकेआरसाठी हे करुन दाखवले होते.