AUS vs ENG : ‘हे तंत्रज्ञान काढून टाका!’, स्निकोमीटरच्या चुकीच्या निर्णयामुळे मिचेल स्टार्क संतापला

नेमकं काय घडलं?
इंग्लंडच्या डावादरम्यान जेमी स्मिथ फलंदाजी करत असताना पॅट कमिन्सच्या चेंडूवर एक विचित्र प्रसंग घडला. चेंडू स्मिथच्या ग्लव्हजला लागून स्लिपमध्ये असलेल्या क्षेत्ररक्षकाकडे गेला आणि त्याने झेल टिपला. मैदानी पंचांनी हा निर्णय तिसऱ्या पंचांकडे सोपवला. मात्र, स्निकोमीटरमध्ये कोणताही आवाज (Spike) नोंदवला गेला नाही.
“Snicko needs to be sacked. That’s the worst technology there is. They make a mistake the other day and they make another mistake today.” – Starc
“(Smith’s) got to get the doctor because his head’s apparently got blown off.” – Marnus
Some DRS chat again… pic.twitter.com/dkoc7JCqvx
— 7Cricket (@7Cricket) December 18, 2025
त्यामुळे स्पष्टपणे चेंडू ग्लव्हजला लागलेला दिसत असतानाही फलंदाजाला ‘नाबाद’ घोषित करण्यात आले. या निर्णयामुळे मिचेल स्टार्कचा पारा चढला. त्याने स्टंप माईकच्या जवळ जात आपला संताप व्यक्त केला. स्टार्क म्हणाला, “हे स्निकोमीटर काढून टाकलं पाहिजे. कालही त्याने चूक केली आणि आजही त्याच चुकीची पुनरावृत्ती होत आहे. हे तंत्रज्ञान कुचकामी आहे.”
हेही वाचा – Cooper Connolly : प्रीती झिंटाचा मास्टरस्ट्रोक यशस्वी! ऑक्शनमध्ये बोली लागताच ‘या’ खेळाडूची तळपली बॅट
दोन्ही संघांनाही बसला खराब तंत्रज्ञानाचा फटका –
स्निकोमीटरच्या गोंधळाचा फटका फक्त ऑस्ट्रेलियालाच नाही, तर इंग्लंडलाही बसला. ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या डावात अॅलेक्स कॅरीच्या वेळीही असाच वाद झाला होता. चेंडू बॅटच्या जवळ येण्यापूर्वीच स्निकोमीटरवर हालचाल दिसली, पण बॅट जवळ आल्यावर काहीच नोंद झाली नाही. तंत्रज्ञानातील या त्रुटींमुळे दोन्ही संघांच्या खेळाडूंमध्ये नाराजीचे वातावरण आहे.
हेही वाचा – आशिया चषकाचा महासंग्राम! अंतिम फेरीत पुन्हा IND vs PAK आमनेसामने; रविवारी रंगणार हायव्होल्टेज थरार!
तिसऱ्या दिवसअखेर ऑस्ट्रेलियाकडे ३५६ धावांची आघाडी –
ॲडलेड ओव्हलवर खेळल्या जाणाऱ्या या सामन्यात ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात ३७१ धावांचा डोंगर उभा केला होता. प्रत्युत्तरात इंग्लंडचा पहिला डाव २८६ धावांवर आटोपला, ज्यामुळे ऑस्ट्रेलियाला ८५ धावांची महत्त्वपूर्ण आघाडी मिळाली. दुसऱ्या डावातही ऑस्ट्रेलियन फलंदाजांनी चांगली कामगिरी करत ४ बाद २७१ धावा केल्या असून, त्यांची एकूण आघाडी आता ३५६ धावांवर पोहोचली आहे.





