Starc World Record : मिचेल स्टार्कचा वर्ल्ड रेकॉर्ड! कसोटी क्रिकेटमध्ये ‘हा’ खास पराक्रम करणारा ठरला जगातील पहिलाच गोलंदाज
Starc World Record : वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कने (Mitchell Starc) कसोटी क्रिकेटच्या इतिहासात एक नवा जागतिक कीर्तिमान प्रस्थापित केला आहे.

Mitchell Starc World Record Most Test Wickets Left Hand Bowler : ऑस्ट्रेलियाचा स्टार वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कने (Mitchell Starc) कसोटी क्रिकेटच्या इतिहासात एक नवा जागतिक कीर्तिमान प्रस्थापित केला आहे. ऑस्ट्रेलिया आणि बांगलादेश यांच्यातील कसोटी मालिकेतील पहिल्या दिवशी ऑस्ट्रेलियन संघ अवघ्या १९८ धावांवर गारद झाला. यानंतर प्रत्युत्तरादाखल मैदानात उतरलेल्या बांगलादेशची पहिली विकेट घेत स्टार्कने कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारा जगातील पहिला डावखुरा गोलंदाज बनण्याचा ऐतिहासिक पराक्रम केला. विशेष म्हणजे, १३ ऑगस्ट रोजी साजरा केल्या जाणाऱ्या ‘इंटरनॅशनल लेफ्ट हँडर्स डे’च्याच (International Left-Handers Day) दिवशी त्याने हा विक्रम रचला आहे.
ऑस्ट्रेलियन फलंदाजांची दाणादाण; संघ १९८ धावांवर गारद –
बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियन कर्णधार पॅट कमिन्सने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता. मात्र, चहापानाच्या काही वेळानंतरच अवघ्या १९८ धावांवर संपूर्ण ऑस्ट्रेलियन संघ ऑलआउट झाला. स्टीव स्मिथने एकाकी झुंज देत अर्धशतकी खेळी केली, परंतु इतर कोणत्याही फलंदाजाने त्याला साथ दिली नाही. यामुळे कसोटी इतिहासात बांगलादेशविरुद्ध ऑस्ट्रेलियाचा संघ पहिल्यांदाच २०० पेक्षा कमी धावांवर रोखला गेला.
सादमान इस्लामची शिकार अन् इतिहासाची नोंद –
🚨 𝗥𝗘𝗖𝗢𝗥𝗗
𝗠𝗢𝗦𝗧 𝗧𝗘𝗦𝗧 𝗪𝗜𝗖𝗞𝗘𝗧𝗦 𝗔𝗦 𝗔 𝗟𝗘𝗙𝗧-𝗛𝗔𝗡𝗗𝗘𝗥 (𝟰𝟯𝟰) 🥇
And he does it on 𝗜𝗻𝘁𝗲𝗿𝗻𝗮𝘁𝗶𝗼𝗻𝗮𝗹 𝗟𝗲𝗳𝘁𝗵𝗮𝗻𝗱𝗲𝗿𝘀 𝗗𝗮𝘆 ☝️ — could there have been a better day to break this record?
Mitchell Starc’s legacy just keeps getting bigger… pic.twitter.com/ZSxtwSuH3K
— Cricketangon (@cricketangon) August 13, 2026
प्रत्युत्तरात १९९ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या बांगलादेशच्या सलामीवीरांनी सावध सुरुवात केली होती. मात्र, डावाच्या नवव्या षटकातील दुसऱ्याच चेंडूवर मिचेल स्टार्कने सादमान इस्लामला (२० धावा) नॅथन लायनकरवी झेलबाद केले. ही विकेट घेताच मिचेल स्टार्कने कसोटी क्रिकेटमध्ये आपले ४३४ विकेट्स पूर्ण केले आणि आंतरराष्ट्रीय मंचावर नवा इतिहास घडवला.
रंगना हेराथचा विक्रम मोडीत; कपिल देवांची केली बरोबरी –
SHADMAN ISLAM GOES FOR 20 IN 30 BALLS.
Mitchell Starc gets breakthrough for Australia. pic.twitter.com/AZalsS0mCG
— Maina Singh (@Maina_Singhx77) August 13, 2026
या विकेट्ससह स्टार्कने श्रीलंकेचा दिग्गज फिरकीपटू रंगना हेराथचा (४३३ विकेट्स) सर्वात मोठा विक्रम मोडीत काढला. पाकिस्तानचा अक्रम (४१४ विकेट्स) याआधीच त्याच्यामागे राहिला आहे. याचबरोबर कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्स घेण्याच्या बाबतीत स्टार्कने भारताचे महान कर्णधार कपिल देव (४३४ विकेट्स) यांचीही बरोबरी केली आहे. आता आणखी एक बळी घेताच तो कपिल देव यांनाही मागे टाकेल





