Mitchell Starc : मिचेल स्टार्कचा गाबा कसोटीत ‘डबल’ धमाका: 12 वर्षांनंतर ॲशेसमध्ये केला मोठा पराक्रम

मिचेल स्टार्कचा ॲशेसमध्ये ‘दुहेरी’ विक्रम –
मिचेल स्टार्कने फलंदाजीत 141 चेंडूंमध्ये 77 धावांची दमदार खेळी केली. या खेळीदरम्यान त्याने 13 चौकार मारले. गोलंदाजीतील कहरानंतर अर्धशतक झळकावून स्टार्कने असा पराक्रम केला आहे, जो गेल्या 12 वर्षांत ॲशेस मालिकेत कोणत्याही ऑस्ट्रेलियन खेळाडूला साधता आला नव्हता.
Mitchell Starc is the first Australian to score a fifty and take a five-for in a men’s Ashes Test since Mitchell Johnson (64 & 5/42) at the Gabba in 2013 💪 pic.twitter.com/o8YPwiqSS4
— ESPNcricinfo (@ESPNcricinfo) December 6, 2025
5 विकेट्स आणि अर्धशतक: मिचेल स्टार्क हा ॲशेस कसोटी सामन्याच्या एकाच डावात पाच विकेट्स घेणारा आणि अर्धशतक झळकावणारा दुसरा ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू ठरला आहे. स्टार्कच्या 77 धावांच्या या महत्त्वपूर्ण खेळीमुळेच ऑस्ट्रेलियाचा संघ पहिल्या डावात 511 धावांचा डोंगर उभारण्यात यशस्वी झाला. स्टार्कपूर्वी, हा पराक्रम मिचेल जॉनसनने 2013 मध्ये केला होता. जॉनसनने 42 धावांत 5 विकेट्स घेतले होते आणि फलंदाजीत 64 धावांची धडाकेबाज खेळी केली होती.
हेही वाचा – Quinton de Kock : क्विंटन डी कॉकचा कहर! भारताविरुद्ध शतक ठोकत वर्ल्ड रेकॉर्डसह केले अनेक विक्रम
ऑस्ट्रेलियाला मिळाली मोठी आघाडी –
इंग्लंडने पहिल्या डावात केलेल्या 334 धावांना प्रत्युत्तर देताना ऑस्ट्रेलियाने 511 धावा केल्या. त्यामुळे ऑस्ट्रेलियाला पहिल्या डावाच्या आधारावर 177 धावांची मोठी आघाडी मिळाली आहे. ऑस्ट्रेलियाकडून जॅक वेदरल्डने 78 चेंडूंमध्ये 72 धावांची शानदार खेळी केली. याशिवाय मार्नस लाबुशेनने 65 आणि कर्णधार स्टीव्ह स्मिथने 61 धावांचे महत्त्वाचे योगदान दिले. अॅलेक्स कॅरीने 63 धावांची खेळी केली, तर खालच्या फळीत मिचेल स्टार्कने 77 धावा करून संघाला मजबूत स्थितीत आणले.





