Quinton de Kock : क्विंटन डी कॉकचा कहर! भारताविरुद्ध शतक ठोकत वर्ल्ड रेकॉर्डसह केले अनेक विक्रम

Quinton de Kock century create record : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तीन सामन्यांच्या वनडे मालिकेतील तिसरा आणि निर्णायक सामना विशाखापट्टणम येथे खेळला जात आहे. भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. दक्षिण आफ्रिकेसाठी सलामी द्यायला आलेल्या क्विंटन डी कॉकने शानदार शतकी खेळी पाहायला मिळाली, ज्यामुळे त्याने अनेक मोठे विक्रम आपल्या नावावर केले.
भारताविरुद्ध सर्वाधिक शतके ठोकणारा ठरला आफ्रिकेचा खेळाडू –
क्विंटन डी कॉकने या मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांतील अपयश तिसऱ्या सामन्यात शतक झळकावून भरून काढले. यासह त्याने विशाखापट्टणमच्या मैदानावर आपल्या वनडे कारकिर्दीतील 23वे शतक पूर्ण केले. त्याचबरोबर भारताविरुद्ध वनडेत सर्वाधिक सात शतके ठोकणारा दक्षिण आफ्रिकेचा खेळाडू बनला आहे. त्याने दिग्गज खेळाडू एबी डिव्हिलियर्सला (6) मागे टाकले आहे.
भारताविरुद्ध केला जागतिक विक्रम –
Fifty by Quinton de Kock 50*(42)
4 fours 4 sixes#QuintondeKock #INDvsSA pic.twitter.com/jsxFKHAbRy— Rinshupatel🇮🇳 (@Rinshupatel93) December 6, 2025
इतकेच नव्हे, तर तो यष्टीरक्षक-फलंदाज म्हणून एकाच संघाविरुद्ध (भारताविरुद्ध) सर्वाधिक शतके (7) ठोकणारा जागतिक क्रिकेटमधील पहिला खेळाडू ठरला आहे. याबाबतीत त्याने ॲडम गिलख्रिस्ट (श्रीलंकेविरुद्ध 6 शतके) आणि कुमार संगकाराला (भारताविरुद्ध 6 शतके) मागे टाकले. त्याने 89 चेंडूंत 8 चौकार आणि 6 षटकार लगावत 106 धावांची खेळी साकारली.
हेही वाचा – Suryakumar Yadav : सूर्याचा मोठा धमाका! मिळवला नंबर-१ चा मुकुट, टी-२० मध्ये केला ‘हा’ ऐतिहासिक पराक्रम
डी कॉकने केली विराट कोहलीची बरोबरी –
या शतकी खेळीमुळे डी कॉक अनेक विक्रमांमध्ये संयुक्तपणे अव्वल स्थानी पोहोचला आहे:
- भारत-दक्षिण आफ्रिका वनडे सामन्यांमध्ये सर्वाधिक शतके (7) ठोकण्याच्या बाबतीत त्याने विराट कोहलीशी बरोबरी साधली आहे.
- वनडे क्रिकेटमध्ये यष्टिरक्षक-फलंदाज म्हणून सर्वाधिक शतके (23) ठोकण्याच्या बाबतीत त्याने कुमार संगकाराशी संयुक्तपणे पहिले स्थान पटकावले आहे.
- एबी डिव्हिलियर्सनंतर डी कॉक हा भारतामध्ये वनडे क्रिकेटमध्ये 1000 हून अधिक धावा करणारा दुसरा दक्षिण आफ्रिकेचा खेळाडू बनला आहे.





