Mitchell Santner Statement : ‘आमच्या विजयाने कोणी दुखावलं तरी मला अडचण नाही!’ फायनलपूर्वी सँटनरने भारताला डिवचलं, पाहा VIDEO
Mitchell Santner Statement : या ऐतिहासिक सामन्यापूर्वी झालेल्या पत्रकार परिषदेत न्यूझीलंडचा कर्णधार मिचेल सँटनरने भारतीय संघाला आणि कोट्यवधी चाहत्यांना थेट आव्हान दिले आहे.

Mitchell Santner Statement on IND vs NZ Final 2026 : टी-२० विश्वचषक २०२६ चा फायनल सामना भारत आणि न्यूझीलंड यांच्यात ८ मार्च रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला जाणार आहे. या ऐतिहासिक सामन्यापूर्वी झालेल्या पत्रकार परिषदेत न्यूझीलंडचा कर्णधार मिचेल सँटनरने भारतीय संघाला आणि कोट्यवधी चाहत्यांना थेट आव्हान दिले आहे. सँटनरचे हे विधान २०२३ च्या एकदिवसीय विश्वचषकापूर्वी ऑस्ट्रेलियन कर्णधार पॅट कमिन्सने दिलेल्या विधानाची आठवण करून देणारे आहे.
काय म्हणाला मिचेल सँटनर?
फायनलपूर्वी पत्रकार परिषदेत बोलताना मिचेल सँटनर म्हणाला, “जरी या फायनलमध्ये भारतीय संघाला विजयाचा प्रबळ दावेदार मानले जात असले, तरी आमचे लक्ष छोट्या गोष्टींवर केंद्रित असेल. जर आमच्या विजयमुळे काही भारतीय चाहत्यांची मनं दुखावलं, ती आम्हाला त्याची मुळीच अडचण नाही. आम्हाला आमचे पहिले टी-२० विश्वविजेतेपद जिंकायचे आहे आणि त्यासाठी आम्ही सज्ज आहोत.”
🚨BOLD STATEMENT BY MITCHELL SANTNER ON INDIA.🚨
Q 🎙️ : Are you ready to break a billion hearts to win the trophy?
Mitchell Santner🎙️: “We may not be favourites, but if we play well as a team, we can win it — even if it means breaking a few hearts.”🤯 pic.twitter.com/xH8tcf7n4J
— Sam (@Cricsam01) March 7, 2026
अहमदाबादची खेळपट्टी आणि आव्हाने –
यानंतर सँटनरला खेळपट्टीबद्दल विचारले असता तो म्हणाला की, “सध्या खेळपट्टी कव्हर्सने झाकलेली असल्याने मी ती पाहिलेली नाही. पण, ही खेळपट्टी फलंदाजीसाठी पोषक (सपाट) असण्याची शक्यता आहे, जिथे धावांचा पाऊस पडू शकतो.”
दोन्ही संघांचा विश्वचषकातील प्रवास –
या स्पर्धेत दोन्ही संघांना अहमदाबादच्या मैदानावर प्रत्येकी एक पराभव पत्करावा लागला आहे. भारताला दक्षिण आफ्रिकेने तर न्यूझीलंडला इंग्लंडने याच मैदानावर पराभूत केले होते. विशेष म्हणजे, टी-२० विश्वचषकाच्या इतिहासात भारताने आजवर न्यूझीलंडला कधीही हरवलेले नाही (३-० रेकॉर्ड). हे मानसिक दडपण झुगारून तिसऱ्यांदा ट्रॉफी उंचावण्याचे मोठे आव्हान सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील भारतीय संघासमोर असेल.





