IND vs NZ : भारताला टी-२० विश्वचषकात न्यूझीलंडचं कोडं सुटणार का? फायनलपूर्वी हेड टू हेड रेकॉर्ड पाहून फुटेल घाम!
IND vs NZ : 'किवी' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या न्यूझीलंड संघाला टी-२० विश्वचषकात पराभूत करणे भारतासाठी आजवर एक न सुटलेले कोडे राहिले आहे.

IND vs NZ head to head record in T20I : टी-२० विश्वचषक २०२६ च्या अंतिम सामन्यात भारतीय संघ इतिहास रचण्याच्या इराद्याने मैदानात उतरणार आहे. मात्र, ‘किवी’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या न्यूझीलंड संघाला टी-२० विश्वचषकात पराभूत करणे भारतासाठी आजवर एक न सुटलेले कोडे राहिले आहे. या ऐतिहासिक मैदानात उतरण्यापूर्वी दोन्ही संघांमधील ‘हेड-टू-हेड’ रेकॉर्ड्स जाणून घेणे महत्त्वाचे ठरेल.
एकूण टी-२० सामन्यांत भारत वरचढ –
आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटचा विचार केला, तर भारतीय संघाचे पारडे जड वाटते. भारत आणि न्यूझीलंड यांच्यात आतापर्यंत एकूण ३० सामने झाले असून त्यापैकी १८ सामन्यांत भारताने विजय मिळवला आहे (यात दोन विजय सुपर ओव्हरमधील आहेत). तर ११ सामन्यांत न्यूझीलंडने बाजी मारली आहे. तसेच एक सामना पावसामुळे रद्द झाला होता. भारतीय भूमीवरही टीम इंडिया १६ पैकी ११ सामने जिंकले आहेत.
टी-२० विश्वचषकातील तो ‘ब्लॅक’ रेकॉर्ड –
WE ARE INTO THE FINAL 🥳#TeamIndia win by 7⃣ runs in Mumbai 🙌
Scorecard ▶️ https://t.co/LxSBs3EDPx#T20WorldCup | #MenInBlue | #ENGvIND pic.twitter.com/C6Yh6ZTd7d
— BCCI (@BCCI) March 5, 2026
सर्वसाधारण टी-२० सामन्यांत भारत बलाढ्य असला, तरी टी-२० विश्वचषकात चित्र पूर्णपणे वेगळे आहे. टी-२० विश्वचषकाच्या इतिहासात भारत आणि न्यूझीलंड आजवर ३ वेळा आमनेसामने आले आहेत आणि तिन्ही वेळा न्यूझीलंडने भारताला धूळ चारली आहे.
२००७, २०१६ आणि २०२१ या तिन्ही विश्वचषकांत भारताला न्यूझीलंडकडून पराभवाचा धक्का सहन करावा लागला आहे. त्यामुळे हा ‘बॅकलॉग’ भरून काढण्याचे मोठे आव्हान सूर्यकुमार यादव आणि कंपनीसमोर असेल.
दोन्ही संघांचा सध्याचा फॉर्म –
या विश्वचषकात भारतीय संघाने अत्यंत सातत्यपूर्ण कामगिरी केली असून, केवळ दक्षिण आफ्रिकेविरुद्ध त्यांना एकमेव पराभव स्वीकारावा लागला आहे. दुसरीकडे, न्यूझीलंडला या स्पर्धेत दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंडकडून हार पत्करावी लागली होती. मात्र, विश्वचषकापूर्वी झालेल्या द्विपक्षीय मालिकेत न्यूझीलंडला भारताकडून १-४ ने पराभव पत्करावा लागला असला, तरी त्यांच्याकडे भारतीय खेळपट्ट्यांवर खेळण्याचा दांडगा अनुभव आहे.





