पॅलेस्टाईनच्या समर्थनार्थ निबंध लिहिणे पडले महागात ; अमेरिकेत भारतीय वंशाच्या विद्यार्थ्याचे निलंबन

MIT Suspend Indian Student । अमेरिकेतील केंब्रिज मध्ये असणारी मॅसॅच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (MIT) ही जगातील सर्वोच्च संस्थांपैकी एक मानली जाते. जगभरातील अनेक देशांतील विद्यार्थ्यांना याठिकाणी शिक्षण घेण्याची इच्छा असते. आता जगातील याच सर्वोच्च संस्थेतील भारतीय वंशाच्या विद्यार्थ्यावर मोठी कारवाई करण्यात आली आहे. भारतीय वंशाच्या प्रल्हाद अय्यंगार या विद्यार्थ्याने एमआयटीमध्ये पॅलेस्टाईनच्या समर्थनार्थ निबंध लिहिला होता, त्यामुळे विद्यापीठाने प्रल्हाद अय्यंगारला निलंबित केल्याची माहिती समोर येत आहे.
प्रल्हाद एमआयटीमध्ये करत होता पीएचडी MIT Suspend Indian Student ।
प्रल्हाद अय्यंगार एमआयटीमधून इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंग आणि कॉम्प्युटर सायन्स विभागात पीएचडी करत होते. पण आता प्रल्हाद अय्यंगार यांची पाच वर्षांची नॅशनल सायन्स फाऊंडेशन ग्रॅज्युएट रिसर्च फेलोशिप त्यांच्या पॅलेस्टाईनच्या समर्थनार्थ निबंधामुळे संपुष्टात आली आहे. एमआयटीने भारतीय वंशाचा विद्यार्थी प्रल्हाद अय्यंगारने गेल्या महिन्यात विद्यापीठाच्या मासिकात लिहिलेल्या निबंधामुळे विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये प्रवेश करण्यास बंदी घातली आहे.
प्रल्हादांच्या निबंधाचे शीर्षक ‘ऑन पॅसिफिझम’
एमआयटीमध्ये प्रल्हाद अय्यंगार यांनी लिहिलेल्या निबंधाचे शीर्षक ‘ऑन पॅसिफिझम’ आहे. विशेष म्हणजे या निबंधात पॉप्युलर फ्रंट फॉर द लिबरेशन ऑफ पॅलेस्टाईनचा लोगोही दाखवण्यात आला आहे. ज्याला अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने दहशतवादी संघटना मानलं आहे.
अय्यंगार यांच्यावर दहशतवादाचे आरोप MIT Suspend Indian Student ।
पॅलेस्टाईनच्या समर्थनार्थ निबंध लिहिल्याबद्दल एमआयटीने प्रल्हाद अय्यंगारला निलंबित केले असून त्याच्या विद्यापीठात प्रवेशावरही बंदी घातली आहे. यासंदर्भात भारतीय वंशाचा विद्यार्थी प्रल्हाद अय्यंगार म्हणतो की, त्याच्यावर दहशतवादाचे बिनबुडाचे आरोप केले जात आहेत, हे चुकीचे आहे. निबंधात दिलेल्या छायाचित्रांमुळेच हे आरोप केले जात आहेत, असे तो म्हणाला.





