बेपत्ता झालेले रशियन विमान कोसळले ; ५ चिमुरड्यांसह ४३ जणांचा मृत्यू

Russian plane crash। आज एक रशियन प्रवासी विमान बेपत्ता झाल्याची माहिती समोर आली होती, परंतु आता हे बेपत्ता झालेले विमान कोसळल्याची माहिती मिळाली आहे. एका इंग्रजी वृत्तसंस्थेच्या वृत्तानुसार, या प्रवासी विमानात ५० लोक होते. अंगारा एअरलाइन्सचे विमान चीनच्या सीमेवरील अमूर प्रदेशातील टिंडा शहराकडे जात होते, परंतु मध्यंतरी त्याचा हवाई वाहतूक नियंत्रणाशी संपर्क तुटला. आता रशियन माध्यमांनी दावा केला आहे की विमानाचे अवशेष सापडले आहेत. त्याचे काही व्हिडीओ देखील समोर आले आहेत.
रशियाच्या एका वृत्तसंस्थेच्या वृत्तानुसार, रशियाचे An-24 प्रवासी विमान टिंडा विमानतळावर उतरण्याचा प्रयत्न करत होते, परंतु त्याचा पहिला प्रयत्न अयशस्वी झाला. तो दुसऱ्या प्रयत्नासाठी आकाशात फिरत होते आणि नंतर बेपत्ता झाल्याचे सांगण्यात आले. प्रादेशिक गव्हर्नर वसिली ऑर्लोव्ह यांनी, “प्राथमिक माहितीनुसार, विमानात पाच मुलांसह ४३ प्रवासी आणि सहा क्रू मेंबर्स होते” असे म्हटले आहे.
वैमानिकाच्या चुकीमुळे विमान कोसळले का? Russian plane crash।
एका इंग्रजी वर्तमानपत्रानुसार, सुरुवातीच्या अहवालांमध्ये असा दावा करण्यात आला आहे की विमान पायलटच्या चुकीमुळे कोसळले. खराब हवामानामुळे दुसऱ्या लँडिंगच्या प्रयत्नात त्याला काहीही स्पष्ट दिसत नव्हते आणि त्यामुळे हा अपघात झाला असल्याचे सांगण्यात येत आहे.
विमान सुमारे ५० वर्षे जुने Russian plane crash।
सायबेरियातील अंगारा एअरलाइन्सचे हे विमान सुमारे ५० वर्षे जुने असल्याचे सांगितले जाते. त्याच्या शेपटीच्या क्रमांकावरून ते १९७६ मध्ये बांधले गेले होते असे दिसून आले. बचाव पथक हेलिकॉप्टरद्वारे विमानाचा शोध घेत होते, तेव्हा विमानाचा पुढचा भाग जमिनीवर जळताना दिसला. हे पाहून बचाव पथक तात्काळ घटनास्थळी पोहोचले. टिंडा विमानतळाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे की, “पायलट दुसऱ्यांदा विमान उतरवण्याचा प्रयत्न करत होता. त्याच्याकडून काही चूक झाल्याबद्दल अजूनही शंका आहे.”





