Missing Link: ‘इन्फ्रामॅनचा डिझास्टर मॅन झाला’ ; मिसिंग लिंकचा स्लॅब कोसळल्यानंतर विरोधकांच्या निशाण्यावर मुख्यमंत्री
Missing Link: लोणावळ्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवरील बहुचर्चित मिसिंग लिंक प्रकल्पात स्लॅब कोसळल्याची घटना घडली.

Missing Link: लोणावळ्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवरील बहुचर्चित मिसिंग लिंक प्रकल्पात स्लॅब कोसळल्याची घटना घडली. एन्ट्री पॉईंटजवळ स्लॅबला भगदाड पडल्याने माती आणि पाण्याचा मोठा लोंढा थेट रस्त्यावर आला. काही दिवसांपूर्वीच या मार्गावरील खड्ड्यांचे फोटो व्हायरल झाले होते.
त्यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहिल्या पावसात रस्त्याच्या ड्युराबिलिटी आणि अभियांत्रिकी गुणवत्तेची चाचणी होत असल्याचे सांगत विरोधकांच्या टीकेला प्रत्युत्तर दिले होते. मात्र, आता स्लॅब कोसळल्याची घटना समोर आल्यानंतर विरोधकांनी सरकारवर पुन्हा निशाणा साधला असून, प्रकल्पाच्या दर्जा आणि देखरेखीवर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत.
“इन्फ्रामॅनचा डिझास्टर मॅन झाला” Missing Link:
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत , “पहिल्याच पावसात Infra Man चा Disaster Man झाला आहे! दोन खड्ड्यांना ‘पहिल्या पावसाचं टेस्टिंग’ म्हणणारे मुख्यमंत्री, आता मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेच्या हजारो कोटींच्या ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पावर दरड कोसळून रस्ता बंद झाल्यालाही ‘मान्सून ट्रायल’ म्हणणार का? जगभर डोंगर फोडून बोगदे उभे राहतात, पण महाराष्ट्रात पहिल्याच पावसात प्रकल्प कोसळतात. कारण समस्या पावसाची नाही, तर निकृष्ट कामांची, भ्रष्टाचाराची आणि कंत्राटदारांना मिळणाऱ्या राजकीय अभयाची आहे. हजारो कोटींचे प्रकल्प… पण पहिल्याच पावसात विकासच ‘मिसिंग’,” अशी टीका त्यांनी केलीय.
पहिल्याच पावसात Infra Man चा Disaster Man झाला आहे!
दोन खड्ड्यांना “पहिल्या पावसाचं टेस्टिंग” म्हणणारे मुख्यमंत्री, आता मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेच्या हजारो कोटींच्या ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पावर दरड कोसळून रस्ता बंद झाल्यालाही “मान्सून ट्रायल” म्हणणार का?
जगभर डोंगर फोडून बोगदे उभे… pic.twitter.com/nzzbE9XFIe— Harshwardhan Sapkal (@INCHarshsapkal) July 6, 2026
तर दुसरीकडे काँग्रेस नेते सतेज पाटील म्हणाले की, “मिसिंग लिंकवरून सुरू असलेलं क्रेडिट वॉर आपण बघितलं आहे. आताच्या परिस्थितीचे देखील क्रेडिट यांनी घ्यावे. पावसाचा ऑरेंज अलर्ट होता आधी सांगायला पाहिजे होतं, मात्र नियोजन कुठेही दिसलं नाही. वाहतूक रखडणे, अपघात होताना द्रुतगती महामार्गावर दिसतात. हे फेल्युअर ऑफ गव्हर्नन्स आहे.
मंत्री म्हणतात अजून परिस्थिती खराब होणार आहे, प्रचंड प्रमाणात पाऊस पडणार आहे. गैरसोय होऊ नये म्हणून सांगायला पाहिजे होतं ना. हे संवेदनहीन सरकार आहे. पुण्याहून मुंबईला येणारे मार्ग बंद आहे. सरकारनं कंट्रोल रुमच्या माध्यमातून काय घडते आहे हे बघणं गरजेचं आहे. अधिकारी, कर्मचारी कामकाजासाठी पोहोचले आहेत. सरकारनं आधी निवेदन करावं, उपाययोजना काय? हे सांगावं, किती मृत्यू झाले, मुंबई पुणे महामार्ग कधी सुरू होणार? हे सांगावे,” असे त्यांनी म्हटले.
त्यासोबतच काँग्रेस नेते विजय वड्डेटीवार यांनी राज्य सरकारवर टीका करताना, “मिसिंग लिंक असेल किंवा इतर ठिकाणी दरड कोसळणे, हे सरकार टक्केवारीचे आहे. टक्केवारी घेतल्याने सरकारकडूनही काहीही होणार नाही. सर्व काही मनगटाला रेटून कामं सुरू आहेत,” असा घणाघात त्यांनी केलाय.
मिसिंग लिंक रोड नव्हे तर ‘विकास मिसिंग’ लिंक रोड Missing Link:
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे म्हणाल्या की, “मिसिंग लिंक रोड नव्हे तर ‘विकास मिसिंग’ लिंक रोड! पुणे–मुंबई द्रुतगती मार्गावरील मिसिंग लिंक प्रकल्पाचा मोठा गाजावाजा झाला.
मिसिंग लिंक रोड नव्हे तर ‘विकास मिसिंग’ लिंक रोड !
पुणे–मुंबई द्रुतगती मार्गावरील मिसिंग लिंक प्रकल्पाचा मोठा गाजावाजा झाला. दोनच महिन्यांपूर्वी मोठ्या थाटामाटात या रोडचा उद्घाटन सोहळा पार पडला. पण पहिल्याच पावसात या रोडवर खड्डे पडले. त्यावर लोकांनी प्रश्न विचारला तर “ट्रायल… pic.twitter.com/0MVFQYCp0W
— Adv Rohini Eknathrao Khadse (@Rohini_khadse) July 6, 2026
दोनच महिन्यांपूर्वी मोठ्या थाटामाटात या रोडचा उद्घाटन सोहळा पार पडला. पण पहिल्याच पावसात या रोडवर खड्डे पडले. त्यावर लोकांनी प्रश्न विचारला तर ‘ट्रायल सुरू होती,’ असं सांगितलं गेलं. आज थेट दरड कोसळून वाहतूक बंद झाली आहे. खरंतर महायुती सरकारचा विकास जाहिरातींमध्येच दिसतो. प्रत्यक्षांत मात्र ‘विकास’ मिसिंग आहे! जनतेच्या पैशातून उभारलेले प्रकल्प टिकाव धरत नसतील, तर तो विकास नसून जनतेच्या विश्वासाशी केलेला खेळ आहे,” असे टीका त्यांनी केलीय.





