प्रभात वृत्तसेवा मंचर – पेठ (ता.आंबेगाव) येथील १६ वर्षांची दीक्षा दत्तात्रय पवळे ही मुलगी दि. ३० ऑगस्ट २०२४ रोजी सकाळी साडेसातच्या सुमारास घरातून बाहेर पडल्यापासून बेपत्ता आहे. अज्ञात व्यक्तीने तिला काहीतरी आमिष दाखवून पळवून नेल्याची फिर्याद तिची आई दिपाली दत्तात्रय पवळे यांनी मंचर पोलीस ठाण्यामध्ये दिली आहे.बेपत्ता दीक्षा हिचे वय १६ वर्षे ७ महिने असून उंची सुमारे ५ फूट ५ इंच आहे. ती रंगाने गोरी, अंगाने सडपातळ असून निळ्या रंगाचा हाफ टी-शर्ट, निळ्या रंगाची नाईट पँट आणि ग्रे रंगाचे अपर व सँडल परिधान केले होते. ती मराठी भाषा बोलते आणि १२ वी कॉमर्सचे शिक्षण घेत आहे.या प्रकरणी मंचर पोलीस ठाणे येथे अज्ञात व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.बेपत्ता मुली बाबत माहिती मिळाल्यास नागरिकांनी मंचर पोलीस ठाणे किंवा पोलीस उपनिरीक्षक सनिल धनवे यांच्याशी संपर्क साधावा.