क्षेपणास्त्र वाहक एमसीए बार्ज नौदलाकडे सुपूर्द

मुंबई : क्षेपणास्त्र आणि दारूगोळा वाहून नेणारी आठवी बार्ज शनिवारी नौदलाच्या ताफ्यामध्ये समारंभपुर्वक समाविष्ट करण्यात आली. मुंबईतील नौदल गोदीमध्ये हा समारंभ पार पडला. या समारंभाचे प्रमुख अतिथी कमोडोर राजेश बार्गोटी होते. या बार्जबरोबरच, सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग क्षेत्रातील या जहाज बांधणी कंपनीने भारतीय नौदलासाठीच्या सर्व आठ बार्ज करारानुसार नौदलाला सुपूर्द केल्या.
आठ एमसीए बार्जच्या बांधणी आणि वितरणासाठी एमएसएमई जहाज बांधणी कंपनी, मेसर्स सेकॉन इंजिनियरिंग प्रोजेक्ट्स प्रायव्हेट लिमिटेड, विशाखापट्टणम यांच्याशी १९ फेब्रुवारी २०२१ रोजी करार करण्यात आला होता. या बार्जची रचना भारतीय जहाज डिझाइनिंग कंपनीच्या सहकार्याने स्वदेशी पद्धतीने करण्यात आली असून, समुद्रात तग धरण्याच्या त्यांच्या क्षमतेची यशस्वी चाचणी नौदल विज्ञान आणि तंत्रज्ञान प्रयोगशाळा अर्थात एनएसटीएल, विशाखापट्टणम येथे करण्यात आली आहे. या बार्ज भारतीय नोंदणी जहाजच्या संबंधित नौदल नियम व नियमावलीनुसार बांधण्यात आल्या आहेत.
या आठ बार्जपैकी सात बार्ज आधीच नौदलात समाविष्ट करण्यात आल्या असून, त्या भारतीय नौदलात आपापली जबाबदारी पूर्ण करत आहेत. या बार्ज नौदलाच्या विविध प्लॅटफॉर्मवर जेट्टीजवळ तसेच बाहेरील बंदरांवरून साहित्य/दारूगोळा वाहतूक, चढवणे आणि उतरवणे यासाठी मदत करतील.
हलक्या लढाऊ विमानाचा भाग हिंदुस्थान एरॉनॉटिककडे
अल्फा टोकॉल इंजिनिअरिंग सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेडने उत्पादित केलेल्या हलक्या लढाऊ विमान एम के 1 चा पहिला मागील भाग रविवारी कर्नाटकातील बंगळुरू येथील विमान विभागात संरक्षण मंत्र्यांच्या उपस्थितीत हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडला सुपूर्द केला.
राजनाथ सिंह यांनी एचएएल आणि खासगी क्षेत्र सशस्त्र दलांना सातत्याने नवीनतम प्लॅटफॉर्म आणि तंत्रज्ञानाने सुसज्ज करत आहेत अशा शब्दांत त्यांची प्रशंसा केली. फ्यूजलेज हा विमानाचा मुख्य भाग असून यात वैमानिक, प्रवासी आणि मालवाहतूक होते, तर मागील भाग शेपटाकडच्या भागाला आणि त्याच्याशी संबंधित घटकांना आधार देतो. देशाच्या संरक्षण आणि अवकाश क्षेत्राचे फ्यूजलेज म्हणून संरक्षणमंत्र्यांनी एचएएलचा उल्लेख केला केले.





