आळंदी देवस्थान संस्थेच्या विश्वतांची गैरवर्तणूक; वारकऱ्यांचा आरोप, व्हिडीओ व्हायरल, नेमकं काय घडलं?

Trusted Yogi Shri Niranjan Nath Video : १९ जून रोजी संत श्री ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखीचे प्रस्थान आळंदीतून पंढरपूच्या दिशेने झाले आहे. लाखो वारकऱ्यांच्या माऊली माऊलीच्या जयघोषात पालखी सोहळा पुण्यात दाखल झाला आहे. दुसरीकडे जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा देखील पुण्यात दाखल झाला आहे.
दोन्ही पालख्यांचा मुक्काम दोन दिवस पुण्यात असणार आहे. अशातच आळंदी देवस्थान संस्थेचे विश्वस्त योगी श्री निरंजन महाराज यांच्या गैरवर्तवणुकीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यांच्या वर्तुवणुकीमुळे वाद निर्माण झाला आहे.
पुण्यातील विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात आळंदी देवस्थान संस्थेचे विश्वस्त योगी श्री निरंजन नाथ यांनी वारकरी, मीडिया प्रतिनिधी तसेच पोलिसांशी उद्धट वर्तन करत अरेरावी केल्याचा आरोप करण्यात येत आहे. यामुळे वारकरी आणि भक्तांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. या घटनेची माहिती वेगाने पसरली असून, वारकरी समुदायाने याबाबत मंदिर प्रशासनाला दखल घेण्याची मागणी केली आहे.
पुण्यातील विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात आळंदी संस्थानच्या विश्वस्ताची अरेरावीची वर्तणूक; वारकरी आणि माध्यमांसोबत गैरवर्तन#punenews #Pune #Warkari #warkrivideo #viralvideo pic.twitter.com/OeTj2R5Rak
— Harish Malusare (@harish_malusare) June 21, 2025
नेमकं काय घडलं?
पुण्यातील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी सोहळ्याच्या अगोदर आळंदी देवस्थान संस्थेचे विश्वस्त योगी श्री निरंजन नाथ तिथे आले होते. त्यावेळी त्यांनी काही वारकरी मीडिया प्रतिनिधींशी असभ्य वर्तन केले, असा आरोप होतो आहे. प्रत्यक्षदर्शिनी दिलेल्या माहितीनुसार, मंदिरात मोठी गर्दी झाली होती. परंपरेनुसार वारकरी आणि मीडियाचे प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते. अशी परिस्थिती असताना निरंजन नाथ यांच्याकडून गैरवर्तन करण्यात आल्याने याबाबत अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे.
हेही वाचा : “निवडणुकीत मतांची चोरी करून ती लपवण्याची व्यवस्था केली,” नाना पटोलेंचा केंद्र सरकारसह निवडणूक आयोगावर आरोप



