Nagar | १५ व्या वित्त आयोगाच्या निधीचा अपहार
Updated On:

पारनेर, (प्रतिनिधी)- जिल्हा परिषद कार्यालय, नगर येथे भ्रष्टाचार विरोधी जन आक्रोश संघटनेच्या वतीने पारनेर पंचायत समितीमध्ये १५ व्या वित्त आयोगामध्ये झालेल्या अपहाराची चौकशी करावी तसेच जिल्हा परिषद यांच्याकडून प्राप्त झालेल्या अहवालानुसार दोषी असणाऱ्या अधिकाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करावी,
या प्रमुख मागणीसाठी संघटनेच्या वतीने जिल्हाध्यक्ष योगेश कुलथे हे १५ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता आमरण उपोषणाला बसले आहेत. याबाबत अद्याप कोणताही तोडगा निघाला नसल्याने आंदोलकांनी प्रशासनाचा तीव्र शब्दांत निषेध व्यक्त केला आहे.
याप्रसंगी संघटनेचे प्रदेश अध्यक्ष रघुनाथ आंबेडकर, संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष काशिनाथ पाचंगे, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा अलका झरेकर, संपर्कप्रमुख प्रेरणा धेंडे, मनसेचे पारनेर तालुका उपाध्यक्ष रवी रासकर आदी उपस्थित होते.





