पुन्हा मिर्जापूर…! “पण यावेळी वेबसिरीज नाही तर…”; अभिनेत्री श्वेता त्रिपाठीने दिली मोठी अपडेट

Actress Shweta Tripathi : बॅालीवूड अभिनेत्री श्वेता त्रिपाठीला ‘मिर्जापूर’ या वेबसिरीजमुळे मोठी प्रसिद्ध मिळाली. या वेबसिरीजमध्ये तिने साकारलेल्या ‘गोलू’ या पात्राची मोठी प्रशंसा झाली. या सिरीजचे एकूण तीन सीझन रिलीज करण्यात आले असून आता मिर्जापूर नावाने एक सिनेमा तयार करण्यात येणार असल्याची माहिती सिरीजच्या मेकर्संनी दिली होती. याविषयीची एक अपडेट समोर आली आहे.
‘मिर्जापूर: द फिल्म’ असं या सिनेमाचं नाव असून, या सिनेमाच्या शुटिंगला सुरूवात झाली आहे. मिर्जापूर सिनेमा हा मिर्जापूर वेबसिरीजवर आधारित असणार आहे. या सिनेमात पुन्हा एकदा श्वेता त्रिपाठी गोलूच्या भूमिकेत दिसणार आहे. हा सिनेमा पुढच्या वर्षी 2026 मध्ये रिलीज करण्याचा सिरीजच्या मेकर्संचा मानस असल्याची माहिती आहे.
पीटीआयने दिलेल्या माहितीनुसार, श्वेताने वाराणसी येथे ‘मिर्जापूर: द फिल्म‘ या सिनेमाच्या शुटिंगला सुरुवात केली आहे. या सिनेमात पंकज त्रिपाठी, अली फजल आणि दिव्येंदु शर्मा हे सर्व कलाकार पुन्हा एकदा त्याच भूमिकेत पाहायला मिळणार आहे. पण सिनेमाची कथा ही सारखीच असणार का? याबाबत अद्यापर्यंत काही ठोस माहिती मिळू शकलेली नाही. मात्र, या सिरीजच्या मेकर्संनी दिलेल्या माहितीनुसार, खास चित्रपटगृहात या सिरीजचा आस्वाद घेता यावा. म्हणून ‘मिर्जापूर: द फिल्म’ तयार केली जात आहे.
श्वेता ही वाराणसीला आपले दुसरे घर मानते. तिने दिलेल्या माहितीनुसार तिचे अनेक प्रोजेक्ट हे याच शहराशी निगडित आहेत. मसान, शो ‘एस्केप लाइव’, कालाकूट ही त्यापैकी काही सिनेमांची नावे आहेत. श्वेता म्हणाली हे शहर मला सतत बोलावतं असतं. इथल्या माणसांचं नेहमी मला प्रेम मिळतं. यामुळेच मी इथे सारखी येते.
हेही वाचा : NDA मध्ये जागा वाटपावरून वाद ; “राजकारणात पर्याय नेहमीच उपलब्ध असतात” म्हणत चिराग पासवान पक्षाचा इशारा





