Sangli News : मिरजमध्ये मद्यधुंद जीपचालकाचा शंभर फुटी रोडवर थरार; चार चाकीला धडक
Sangli News : शनिवारी दुपारी मिरज शहरातील गजबजलेल्या शंभर फुटी रोडवर एका मद्यधुंद टाटा सुमो (Tata Sumo) चालकाने जबरदस्त थरार माजवला.

Sangli News : मिरजेत शनिवारी दुपारी एका मद्यधुंद सुमोचालकाने शंभर फुटी रोडवर थरार माजवला. एका चार चाकीला जोराची धडक देत थेट महापालिकेच्या सुशोभित कारंजाला उडवलं. मात्र, सतर्क नागरिकांनी पाठलाग करत त्याला पकडलं. (Sangli News)
शुभम राजेंद्र गायकवाड (रा. गव्हर्नमेंट कॉलनी, कुंभारमळा, विश्रामबाग) हा मद्यधुंद अवस्थेत टाटा सुमो घेऊन भरधाव वेगाने सुसाट निघाला होता. नशेत असलेल्या या चालकाने सुरेश लक्ष्मण नांदरेकर (रा. आशीर्वाद कॉलनी, शंभर फुटी रोड, मिरज) यांच्या चार चाकीला पाठीमागून जोराची धडक दिली. (Sangli News)
एवढ्यावरच न थांबता सुमो थेट चौकातील महापालिकेच्या सुशोभित कारंजावर आदळली. या धडकेत चार चाकी व कारंज्याचे मोठे नुकसान झाले. अपघात करूनही चालकाने सुमो पळवण्याचा प्रयत्न केला. (Sangli News)
मात्र, घटना पाहिलेल्या स्थानिक नागरिकांनी तातडीने पाठलाग केला आणि त्याला पकडून महात्मा गांधी चौक पोलिसांच्या ताब्यात दिले. रस्त्यावर त्यावेळी रहदारी कमी असल्याने मोठा अनर्थ टळला. (Sangli News)





