नगर | अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणारा जेरबंद

नगर, (प्रतिनिधी) – कोपरगाव तालुक्यातील एका अल्पवयीनcकरणारा आरोपी स्थानिक् गुन्हे शाखेचे पथकाने जेरबंद केला आहे. मोहसिन रियाज शेख (वय 34, रा. गांधीनगर, कोपरगाव), असे ताब्यात घेतलेल्या आरोपीचे नाव असून त्याला कोपरगाव पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
या बाबत माहिती अशी की, अल्पवयीन मुलगी ही रविवार (दि.१८) रोजी कोपरगाव बसस्थानकात बसली असता संशयित आरोपी मोहसीन शेख याने तिचेकडे पाहुन अश्लील हावभाव केले. व फिर्यादीचा पाठलाग करुन लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
याबाबत स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांना मिळालेल्या माहितीनुसार संशयीत आरोपी शेख हा गांधीनगर (ता.कोपरगाव) येथे येणार असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली. त्यानुसार गुन्हे शोध पथकातील अंमलदार बाळासाहेब मुळीक, रवींद्र कर्डिले, बाळासाहेब गुंजाळ व उमाकांत गावडे यांच्या पथकाने वरील आरोपीस मोठ्या शिताफीने ताब्यात घेतले.





