“मंत्री मेघना बोर्डीकर यांची कुकाणे आरोग्य केंद्राला सदिच्छा भेट; सुविधांबाबत समाधान व्यक्त”

नेवासा : राज्याच्या सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी नेवासा तालुक्यातील कुकाणे येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला नुकतीच सदिच्छा भेट दिली. या भेटीदरम्यान त्यांनी केंद्रातील विविध विभागांची पाहणी केली आणि उपलब्ध सुविधांबाबत समाधान व्यक्त केले. तसेच, त्यांनी आरोग्य अधिकारी व कर्मचाऱ्यांशी संवाद साधत त्यांच्या कार्याचे कौतुक केले.
मंत्री बोर्डीकर यांच्या आगमनानंतर तालुका आरोग्य अधिकारी डॉ. दीपक डिंबर आणि वैद्यकीय अधिकारी डॉ. कैलास कानडे यांनी त्यांचे स्वागत केले. कुकाणे ग्रामपंचायत व जाणता राजा ग्रुपच्या वतीने सरपंच अमोल अभंग आणि प्रा. सुनील गर्जे यांनी त्यांचा सत्कार केला.
यावेळी गटविकास अधिकारी संजय लखवाल, नेवासे तालुका वकील संघाचे अध्यक्ष अॅड. गणेश निकम, ग्रामपंचायत माजी सदस्य समीर पठाण, काँग्रेसचे राज्य उपाध्यक्ष अभिजीत लुणीया, युनूस नालबंद, शिवसेनेचे राजेंद्र राऊत आणि जावेद शेख उपस्थित होते. मंत्री बोर्डीकर यांनी आरोग्य केंद्रातील स्वच्छता, उपलब्ध सुविधा आणि कर्मचाऱ्यांच्या कार्यपद्धतीबाबत समाधान व्यक्त केले. या भेटीदरम्यान आरोग्य विभागाच्या अनिता सुर्यवंशी, वैशाली बनसोडे, नीता पोपाळघट, विजय चिलगर यांच्यासह इतर कर्मचारी उपस्थित होते.





