पुणे विद्यापीठात “जयकर परिवार स्नेहमेळावा” उत्साहात संपन्न
Updated On:

पुणे – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील जयकर (मिनी जयकर) अभ्यासिकेच्या माजी विद्यार्थांचा स्नेहमेळावा रविवारी (28 जुलै) विद्यापीठ परिसरात उत्साहात पार पडला. अभ्यासिकेत अभ्यास करून शासकीय, राजकीय, शैक्षणिक, सामाजिक, वकील, डॉक्टर, व्यावसायिक, उद्योजक आदी क्षेत्रात कार्यरत असलेले 50हून अधिक मित्र अनेक वर्षानंतर एकत्र आले होते. मनोगत, भोजन, विद्यापीठ फेरफटका यासह विविध उपक्रमांनी स्नेहमेळावा संपन्न झाला.
कार्यक्रमा दरम्यान, सर्व उपस्थित सदस्यांनी आपला परिचय करून दिला. काही मान्यवरांनी आपले प्रेरणादायी अनुभव मांडले. यावेळी अनेकजण भावनिक झाले. स्नेहमेळावा कार्यक्रम दरवर्षी आयोजित करावा, अशी इच्छा यावेळी अनेकांनी व्यक्त केली.





