बारामतीत भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्या प्रतिमेस दुधाचा अभिषेक

जळोची(प्रतिनिधी) – बारामती तालुक्यातील उंडवडी येथे भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्या प्रतिमेस दुधाचा अभिषेक घालून भाजप कार्यकर्त्यांनी पडळकर यांना समर्थन दिले. आमदार पडळकर यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या विषयी आक्षेपहार्य विधान केले होते. यावरून राज्यभरातून राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून निषेध नोंदविला जात आहे.
या पार्श्वभूमीवर बारामतीत भाजप कार्यकर्त्यांकडून घोषणाबाजी देत समर्थन देण्यात आले होते. त्यानंतर आज बारामती तालुक्यातील उंडवडी येथे तालुकाध्यक्ष पांडुरंग कचरे, शहराध्यक्ष सतीश फाळके, जिल्हा सरचिटणीस अविनाश मोटे यांच्यासह गोविंद देवकाते, अँड.ज्ञानेश्वर माने, जयराज बागल, विशाल कोकरे, प्रकाश मोरे, प्रमोद खराडे, भाऊसाहेब मोरे व इतर कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत आमदार पडळकर यांच्या प्रतिमेस दुधाचा अभिषेक घालून त्यांच्या समर्थनार्थ घोषणा दिल्या.
एकच छंद गोपीचंद, आय सपोर्ट गोपीचंद पडळकर अशा घोषणा देत पडळकर यांना समर्थन दिले. या प्रकारानंतर तालुका पोलिसांनी भाजपच्या सहा प्रमुख कार्यकर्त्यांना पोलीस ठाण्यात नेले आहे.





