MI vs DC : हरमनप्रीतचा ‘रुद्रावतार’ अन् मुंबईचा धमाका! दिल्ली कॅपिटल्सला धूळ चारत नोंदवला पहिला विजय

MI vs DC Mumbai Indians beat Delhi Capitals : डब्ल्यूपीएल २०२६ च्या तिसऱ्या सामन्यात गतविजेत्या मुंबई इंडियन्सने आपला खरा रुद्रावतार दाखवला आहे. पहिल्या सामन्यातील पराभवानंतर जोरदार पुनरागमन करत हरमनप्रीत कौरच्या संघाने दिल्ली कॅपिटल्सचा ५० धावांनी एकतर्फी पराभव केला. कर्णधार हरमनप्रीत कौर आणि नॅट सायव्हर-ब्रंट यांच्या तुफानी फलंदाजीनंतर गोलंदाजांनी केलेल्या टिच्चून माऱ्यामुळे मुंबईने स्पर्धेतील पहिल्या विजयाची नोंद केली.
धावांचा डोंगर आणि हरमनप्रीतची ‘कॅप्टन इनिंग’ –
या सामन्यातही नाणेफेक मुंबईच्या बाजूने लागली नाही. प्रथम फलंदाजी करताना मुंबईची सुरुवात खराब झाली, सलामीवीर अमेलिया केर पहिल्याच चेंडूवर बाद झाली. मात्र, त्यानंतर नॅट सायव्हर-ब्रंट आणि हरमनप्रीत कौर यांनी दिल्लीच्या गोलंदाजीची पळता भुई थोडी केली. हरमनप्रीत कौरने ४२ चेंडूत नाबाद ७४ धावा (८ चौकार, ३ षटकार) केल्या.
A convincing victory 👏
Harmanpreet Kaur-led Mumbai Indians bounce back with a massive 5⃣0⃣-run victory 🔝
Scorecard ▶️ https://t.co/aVKBHVKp7c #TATAWPL | #KhelEmotionKa | #MIvDC pic.twitter.com/W2S5eYyDNa
— Women’s Premier League (WPL) (@wplt20) January 10, 2026
त्याचबरोबर नॅट सायव्हर-ब्रंटने ४६ चेंडूत ७० धावा (१३ चौकार) धावांची वादळी खेळी साकारली. अखेरच्या टप्प्यात निकोला कॅरीने १२ चेंडूत २१ धावांचे महत्त्वाचे योगदान दिले. या जोरावर मुंबईने २० षटकांत ४ बाद १९५ धावांचा डोंगर उभा केला.
In her element 😎
Harmanpreet Kaur leads from the front with her 9⃣th #TATAWPL half-century 🫡
Updates ▶️ https://t.co/aVKBHVKp7c #KhelEmotionKa | #MIvDC pic.twitter.com/vzwpdWY6X1
— Women’s Premier League (WPL) (@wplt20) January 10, 2026
दिल्लीची फलंदाजी ढेपाळली –
प्रत्युत्तरात १९६ धावांच्या विशाल लक्ष्याचा पाठलाग करताना जेमिमा रॉड्रिग्जच्या नेतृत्वाखालील दिल्ली कॅपिटल्सची फलंदाजी पत्त्याच्या बंगल्यासारखी कोसळली. संपूर्ण संघ १९ षटकांत १४५ धावांवरच बाद झाला. चिनेल हेन्रीने सर्वाधिक ५६ धावा केल्या. इतर कोणताही फलंदाज २० धावांपर्यंत पोहोचू शकला नाही. कर्णधार जेमिमा रॉड्रिग्ज देखील फक्त १ धाव करून पॅव्हेलियनमध्ये परतली. शफाली वर्मा देखील ८ पेक्षा जास्त धावा करू शकली नाही. लॉरा वोल्वाड्ट देखील फक्त ९ धावा करू शकली.
मुंबईच्या शिस्तबद्ध गोलंदाजीसमोर दिल्लीचा कोणताही फलंदाज मोठी खेळी करू शकला नाही, ज्यामुळे त्यांना ५० धावांनी पराभव स्वीकारावा लागला. मुंबईकडून अमेलिया केर आणि निकोला केरी यांनी उत्कृष्ट गोलंदाजी केली, प्रत्येकी ३ विकेट्स घेतल्या. नॅट सायव्हर-ब्रंटने तिच्या फलंदाजीतील कामगिरीनंतर २ विकेट्स घेतल्या. संस्कृती गुप्ता आणि शबनीम इस्माइल यांनीही प्रत्येकी १ विकेट घेतली.





