Virat Kohli option practice Session miss : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील ३ सामन्यांच्या वनडे मालिकेचा श्रीगणेशा उद्या, ११ जानेवारीपासून वडोदऱ्याच्या कोटांबी स्टेडियमवर होत आहे. या ऐतिहासिक मैदानावरील टीम इंडियाचा हा पहिलाच सामना असणार आहे. सामन्याच्या आदल्या दिवशी भारतीय खेळाडूंनी मैदानावर घाम गाळला, मात्र सराव सत्रातून स्टार फलंदाज विराट कोहली गायब असल्याने चाहत्यांच्या मनात शंकेची पाल चुकचुकली. विराट कोहली सरावाला का आला नाही? न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या सामन्यापूर्वी झालेल्या या शेवटच्या सराव सत्रात रोहित शर्मा, शुबमन गिल आणि केएल राहुल यांसारख्या दिग्गजांनी हजेरी लावली. मात्र, विराट कोहली दिसला नाही. वास्तविक, हे एक ‘ऐच्छिक’ (Optional) सराव सत्र होते. ऐच्छिक सराव सत्रात सहभागी व्हायचे की नाही, याचा निर्णय सर्वस्वी खेळाडूचा असतो. विराटने सरावाऐवजी स्वतःला विश्रांती देऊन ताजेतवाने ठेवण्यावर भर दिल्याचे समजते, त्यामुळे चाहत्यांनी काळजी करण्याचे कारण नाही. विराटच्या निशाण्यावर महाविक्रम – विराट कोहली सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेत त्याने २ शतके आणि १ अर्धशतक झळकावून धुमाकूळ घातला होता. त्यानंतर विजय हजारे ट्रॉफीमध्येही त्याच्या बॅटने आग ओकली आहे. उद्याच्या सामन्यात विराटने केवळ २५ धावा केल्या, तर तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये २८,००० धावा पूर्ण करणारा जगातील दिग्गज खेळाडू ठरेल. हेही वाचा – Jemimah Rodrigues Record : जेमिमा रॉड्रिग्जचा ‘विराट’ पराक्रम! स्मृती मानधनाला मागे टाकत बनली नंबर-1 सराव सत्रात काय घडले? विराट अनुपस्थित असला तरी इतर खेळाडूंनी सरावात कोणतीही कसर सोडली नाही: रोहित-सिराजची जुगलबंदी: मोहम्मद सिराजने फलंदाजी सुधारण्यासाठी रोहित शर्माकडून खास टिप्स घेतल्या. ऋषभ पंतला दुखापत: सरावादरम्यान पंतला चेंडू लागल्याने तो काही काळ वेदनेने विव्हळत होता आणि त्यानंतर मैदानाबाहेर गेला. श्रेयस-केएल राहुलचा सराव: उपकर्णधार श्रेयस अय्यर आणि केएल राहुल यांनी तासनतास फलंदाजीचा सराव केला. आगरकर-गिल चर्चा: मुख्य निवडकर्ता अजित आगरकर आणि कर्णधार शुभमन गिल यांच्यात मैदानावर बराच वेळ खलबतं सुरू होती.