Hardik Pandya Out : मुंबई इंडियन्सला मोठा झटका! हार्दिक पंड्या दिल्लीविरुद्धच्या सामन्यातून बाहेर; नेमकं कारण काय?
Hardik Pandya Out : नाणेफेकीच्या वेळी मुंबईच्या गोटातून एक मोठी बातमी समोर आली असून नियमित कर्णधार हार्दिक पांड्या या सामन्यातून बाहेर झाला आहे.

MI vs DC IPL 2026 Hardik Pandya Out : आयपीएल २०२६ च्या हंगामातील ८ व्या रोमांचक सामन्यात मुंबई इंडियन्स (MI) आणि दिल्ली कॅपिटल्स (DC) हे दोन दिग्गज संघ अरुण जेटली स्टेडियमवर आमनेसामने आले आहेत. या सामन्यात दिल्लीचा कर्णधार अक्षर पटेलने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, नाणेफेकीच्या वेळी मुंबईच्या गोटातून एक मोठी बातमी समोर आली असून नियमित कर्णधार हार्दिक पंड्या या सामन्यातून बाहेर झाला आहे.
दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर नाणेफेकीसाठी हार्दिक पंड्याऐवजी सूर्यकुमार यादव मैदानात आल्याने चाहते थक्क झाले. सूर्याने हार्दिकच्या अनुपस्थितीचे कारण स्पष्ट करताना सांगितले की, हार्दिकची प्रकृती ठीक नसल्यामुळे तो आजचा सामना खेळण्यासाठी पूर्णपणे फिट नाही. त्यामुळे खबरदारी म्हणून त्याला विश्रांती देण्यात आली असून सूर्या आज मुंबईचे नेतृत्व करत आहे. “आम्ही विजयाने हंगामाची सुरुवात केल्यामुळे संघात सकारात्मक वातावरण आहे, आज हार्दिकची उणीव भासेल पण इतर खेळाडू जबाबदारी उचलण्यास सज्ज आहेत,” असे सूर्याने नमूद केले.
मुंबईच्या संघात मोठे बदल –
Hardik Pandya has been ruled out of the clash vs Delhi ❌
Suryakumar Yadav to take over as Stand in Captain ✅
.
. #IPL2026 #DCVsMI #HardikPandya #RuledOut #Injury #SuryakumarYadav #Captain #cricketfans #CricketNews #CricketUpdates #CricketHistory #CricketGyan pic.twitter.com/2tM9yQ7uBf— Cricket Gyan (@cricketgyann) April 4, 2026
हार्दिकच्या अनुपस्थितीत मुंबईने आपल्या संघात तीन महत्त्वाचे बदल केले आहेत. हार्दिक पंड्याच्या जागी वेगवान गोलंदाज दीपक चहर याचा समावेश करण्यात आला आहे. तसेच ट्रेंट बोल्टच्या जागी कॉर्बिन बॉश आणि अल्लाह गझनफरच्या जागी अनुभवी मिचेल सँटनर याला संधी देण्यात आली आहे. दुसरीकडे, दिल्लीने आपल्या घरच्या मैदानावर अक्षर पटेलच्या नेतृत्वाखाली मजबूत फळी उतरवली आहे.
आकडेवारीत मुंबईचा दबदबा –
आयपीएलच्या इतिहासात दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध मुंबई इंडियन्सचे पारडे नेहमीच जड राहिले आहे. या दोन संघांमधील ३७ लढतींपैकी २१ सामने मुंबईने जिंकले आहेत, तर १६ सामन्यांत दिल्लीला यश मिळाले आहे. विशेष म्हणजे, गेल्या हंगामात मुंबईने दिल्लीविरुद्धचे दोन्ही सामने जिंकले होते. आता सूर्याच्या नेतृत्वाखाली मुंबई ही विजयी परंपरा कायम राखणार की अक्षर पटेल घरच्या मैदानावर बाजी मारणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.





