Hardik Pandya Gifts : हार्दिक पंड्याला मानलं! वानखेडेच्या ग्राऊंडस्टाफला दिलं खास गिफ्ट; दिलेला ‘तो’ शब्द पाळतं जिंकली चाहत्यांची मनं
Hardik Pandya Gifts : आयपीएल २०२६ चा हंगाम सुरू होण्यापूर्वी मुंबई इंडियन्सच्या या कर्णधाराने वानखेडे स्टेडियमवरील ग्राऊंडस्टाफला एक खास सरप्राईज देऊन सर्वांची मने जिंकली आहेत

Hardik Pandya Wankhede Ground staff Gift : भारतीय क्रिकेटचा ‘बॅड बॉय’ म्हणून अनेकदा टीका झेलणाऱ्या हार्दिक पांड्याने ( Hardik Pandya) आपल्या दिलदारपणाने टीकाकारांची बोलती बंद केली आहे. आयपीएल २०२६ चा हंगाम सुरू होण्यापूर्वी मुंबई इंडियन्सच्या या कर्णधाराने वानखेडे स्टेडियमवरील ग्राऊंडस्टाफला एक खास सरप्राईज देऊन सर्वांची मने जिंकली आहेत.
मैदानातील आक्रमक पवित्रा आणि आलिशान जीवनशैलीमुळे नेहमीच चर्चेत असणारा हार्दिक पंड्या एका वेगळ्या कारणासाठी पुन्हा एकदा प्रकाशझोतात आला आहे. मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिकने वानखेडे स्टेडियममधील ११ ग्राऊंडस्टाफ कर्मचाऱ्यांना स्वतः स्वाक्षरी केलेले धनादेश (चेक) वाटून त्यांना सन्मानित केले आहे. हार्दिकची ही कृती कोणत्याही प्रसिद्धीसाठी नसून, त्याने काही महिन्यांपूर्वी दिलेल्या एका शब्दाखातर आहे.
नेमकं काय होतं ते ‘वचन’? Hardik Pandya Gifts
टी-२० विश्वचषक २०२६ च्या पूर्वतयारीसाठी हार्दिक पंड्या वानखेडे स्टेडियमवर सराव करत होता. यावेळी तो अनेकदा रात्री उशिरापर्यंत नेट प्रॅक्टिस करायचा. नियमानुसार कामाची वेळ संपलेली असतानाही, वानखेडेच्या ग्राऊंडस्टाफने कोणतीही तक्रार न करता हार्दिकच्या सरावासाठी कसर सोडली नाही. कर्मचाऱ्यांच्या या समर्पणावर खुश होऊन हार्दिकने त्यांना “परत आल्यावर नक्की बक्षीस देईन,” असा शब्द दिला होता.
प्रत्येकाला दिला १० हजारांचा धनादेश – Hardik Pandya Gifts
🚨 FACT CHECK 🚨
Rumors are claiming that Hardik Pandya gifted ₹10 lakh to each member of the MCA Wankhede ground staff — but that’s NOT true ❌
✔️ The actual amount was ₹10,000 per staff member,not ₹10 lakh.(Gaurav Gupta)
Please don’t spread misinformation 🙏#Hardikpandya pic.twitter.com/Sa2M4c0hCZ— Faruk🐦 (@uf2151593) March 27, 2026
आयपीएल २०२६ च्या सराव सत्रासाठी वानखेडेवर परतल्यावर हार्दिक आपले वचन विसरला नाही. त्याने त्या सर्व कर्मचाऱ्यांना बोलावून प्रत्येकी १० हजार रुपयांचा धनादेश सुपूर्द केला. केवळ पैसेच दिले नाहीत, तर त्यांच्यासोबत फोटो काढून त्यांचे आभारही मानले. हे फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून, हार्दिकच्या या संवेदनशीलतेचे कौतुक केले जात आहे.
Hardik Pandya Gifts : हार्दिक पंड्याला मानलं! वानखेडेच्या ग्राऊंडस्टाफला दिलं खास गिफ्ट; दिलेला ‘तो’ शब्द पाळतं जिंकली चाहत्यांची मनं
महागड्या गाड्या आणि घड्याळांचा शौक बाळगणाऱ्या हार्दिकने आपल्या यशात वाटा असणाऱ्या पडद्यामागच्या या हिरोंना दिलेली ही भेट त्याच्यातील ‘दिलदार’ माणसाची ओळख करून देणारी ठरली आहे.





